Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » दक्षिण चीन समुद्रापासून दूरच राहा

दक्षिण चीन समुद्रापासून दूरच राहा

=चीनचा अमेरिकेला इशारा=
Barack Obamaबीजिंग, [१८ नोव्हेंबर] – दक्षिण चीन समुद्रातील वादात अमेरिकेने अजिबात पडू नये. या समुद्रापासून दूरच राहावे, असा स्पष्ट इशारा चीनने आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दिला आहे.
चीनने समुद्रातील ज्या भागावर आपला हक्क सांगितला, तिथेच कृत्रिम द्वीपकल्प बांधण्याचा निर्णय ओबामा प्रशासनाने जाहीर केला. यामुळे चीन चांगलाच संतप्त झाला आहे. याच अनुषंगाने चीनने थेट ओबामा यांनाच, समुद्रातील वादात न पडण्याचा सल्ला दिला आहे.
या भागात आधीच तणावाचे वातावरण असल्याने तो आणखी वाढवू नका आणि वाद किचकट होईल, असे कुठलेही कृत्य करू नका, असा इशारा चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते हॉंग ली यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
दक्षिण चीन समुद्रातील भागावर आमचा कायदेशीर अधिकार असल्याने, येथे आम्ही जे काही बांधकाम आणि कारवाया करू, त्यावर कुणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही, असे ली म्हणाले.
ओबामा यांनी अलीकडेच आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य परिषदेत फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष बेनिग्नो अकिनो यांची मनिला येथे भेट घेऊन, दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम द्वीपकल्प बांधण्याच्या योजनेचे संकेत दिले होते, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=25528

Posted by on Nov 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1223 of 2458 articles)


=श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील तेजस्वी तारा निखळला, आज अंत्यसंस्कार= नवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] - विश्‍व हिंदू परिषदेचे संरक्षक, आक्रमक पण संयमी हिंदुत्ववादी ...

×