Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दक्षिण चीन सागरात भारताला मिळणार नवे ठिकाण

दक्षिण चीन सागरात भारताला मिळणार नवे ठिकाण

=व्हिएतनाममध्ये इस्रोचे केंद्र स्थापन=
South China Seaनवी दिल्ली, [५ जानेवारी] – दक्षिण चीन सागरी क्षेत्रात भारताला लवकरच रणनीतीक ठिकाण मिळणार आहे. व्हिएतनामस्थित नवे सॅटेलाईट मॉनिटरिंग स्टेशन लवकरच सुरू होण्याची भारताला अपेक्षा आहे आणि हे शेजारी देश इंडोनेशियात असणार्‍या आणखी एका अशाच केंद्राशी संलग्न असेल.
भारताने दक्षिण व्हिएतनामचे शहर हो ची मिनमध्ये स्टेट ऑफ द आर्ट रिसेप्शन ऍण्ड ट्रकिंग ऍण्ड टेलिमेट्री स्टेशन स्थापन केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच हे केंद्र सुरू करून इंडोनेशियाच्या बियाकस्थित केंद्राशी जोडणार असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.
हो ची मिन शहरात या अंतराळ केंद्राद्वारे इस्रोला भारतातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांवर नजर ठेवण्यास आणि यातून माहिती प्राप्त करण्यास मदत मिळेल. भारताचे ब्रुनेईत देखील सॅटेलाईट ट्रॅकिंग केंद्र आहे. भारत सरकारने हो ची मिन शहराच्या या नव्या केंद्रावर जवळपास २.३ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत.
भारतासाठी हे केंद्र दक्षिण चिनी सागरात महत्त्वाचे रणनीतीक केंद्र असेल. या क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये चीनचे व्हिएतनाम आणि फिलीपाईन्ससारख्या देशांसोबत तणावाचे संबंध राहिले आहेत. भारत, अमेरिका आणि जपान या देशांनी दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात चीनच्या आक्रमक भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे क्षेत्र जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण मार्गाचा भाग आहे, हे विशेष!
दक्षिण चिनी सागराबाबत चीनचे दावे आणि त्यांच्याकडून कृत्रिम बेट बनविल्यापासून भारत २०१४ पासून सातत्याने नेव्हिगेशन आणि ओव्हर-फ्लाईट स्वातंत्र्यांच्या बाजूने बोलत आला आहे. चीनच्या या पावलाला व्हिएतनाम आणि फिलीपाईन्सने विरोध केला आहे. प्रत्यक्षात या क्षेत्रात चीनच्या बेट निर्मितीशी संबंधित हालचाली या दोन्ही देशांच्या सागरी सीमा आणि एक्सक्लूसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या कक्षेत येतात.
या क्षेत्रात असणार्‍या कृत्रिम बेटावर चीनने पहिले विमान उतरविल्यानंतर व्हिएतनामने संतप्त प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली आहे. चीन आपल्या संप्रभूतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही व्हिएतनामने केला. नैसर्गिक साधनसंपत्तीचे भांडार असण्याबरोबरच जगातील निम्म्यापेक्षा अधिक व्यापारी जहाजे याच मार्गाने वाटचाल करतात. एवढेच नाही, तर चीनच्या विरोधानंतरही दक्षिण चिनी सागराच्या व्हिएतनामी भागात भारताचे दोन ऑईल रिंग आहेत, हे उल्लेखनीय.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26425

Posted by on Jan 6 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (939 of 2453 articles)


लाखोंची उपस्थिती असलेल्या शिवशक्ती संगमात सरसंघचालकांचे प्रतिपादन संघशक्तीचे विराट दर्शन राष्ट्रहित सर्वप्रथम सत्यम्, शिवम्, सुंदरम् हीच आपली संस्कृती संघकार्य ...

×