Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दक्षिण भारतात उष्णतेची लाट

दक्षिण भारतात उष्णतेची लाट

=१३० जणांचा मृत्यू=
tempratureनवी दिल्ली, [१५ एप्रिल] – यावर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली असून, यामुळे आतापर्यंत १३० जणांना आपले प्राण गमवावे लागले.
देशाच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी तापमानाने जुने विक्रम मोडले. येत्या दोन-तीन दिवसांत तापमान एक-दोन डिग्रीने वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेष करून पश्‍चिम भारत, तेलंगणा आणि रायलसीमा भागात उष्णतेच्या लाटेपासून सध्या कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
उष्णतेच्या या लाटेमुळे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात १०० जण दगावले असून, ओडिशात ३० जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. हैदराबाद येथे ४३ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले आणि यामुळे ४३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. एप्रिल महिन्यातच तापमान ४५ अंश सेल्सियस पार करण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, स्कायमेट या खाजगी संस्थेनेही असाच अंदाज व्यक्त केला आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा बळी गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर तेलंगणा सरकारने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बांधकामाच्या ठिकाणी मजुरांच्या काम करण्यावर बंदी घातली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्‍वर येथे ११ एप्रिल रोजी ४५.८ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. १९५२ नंतर शहरात एप्रिल महिन्यात प्रथमच एवढ्या तापमानाची नोंद झाली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यभरातील सर्व शाळा २० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27818

Posted by on Apr 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (494 of 2453 articles)


मुंबई, [१६ एप्रिल] - मुंबईची हृदयवाहिनी म्हणजे भारतीय रेल्वेचा आज ‘१६३ वा वाढदिवस’ आहे. भारतातील पहिली रेल्वे ‘१६ एप्रिल १८५३’ ...

×