Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » दलाई लामांच्या प्रयत्नांवर चीनची टीका

दलाई लामांच्या प्रयत्नांवर चीनची टीका

=तिबेटचे स्वातंत्र्य=
dalai-lamaबीजिंग, [१५ एप्रिल] – तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा आपल्या प्रांताच्या स्वायत्ततेसाठी नव्हे, तर स्वातंत्र्यासाठी गुप्तपणेे पाठिंबा देत आहेत, अशी टीका चीनने केली असून, त्यांनी तिबेटच्या भवितव्याबाबतचे विचार बाजूला सारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
१९५० मध्ये चिनी सैन्याने केलेल्या कारवाईनंतर हा प्रांत शांततापूर्ण मार्गाने स्वतंत्र करण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, तेव्हापासून येथे चीनची जुलमी राजवट सुरू आहे. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेले दलाई लामा यांनी त्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चीनशी अनेकदा चर्चा केली. चीनविरुद्धचा उठाव अपयशी ठरल्यानंतर १९५९ मध्ये दलाई लामा भारतात आले. मात्र, २०१० नंतर चर्चेच्या फेर्‍या थांबल्या आहेत. चीनमध्ये नेतृत्त्वबदल आणि तिबेटमध्ये अराजकता निर्माण झाल्यामुळे चीन आणि दलाई लामा यांच्यातील चर्चेला विराम लागला आहे. दलाई लामा आणि त्यांचे समर्थक तिबेटच्या प्रगतीच्या दृष्टीने त्या प्रांतातील लोकांच्या भावना समजण्यात अपयशी ठरले आहेत, असे सिन्हुआ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22094

Posted by on Apr 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1793 of 2458 articles)


=कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांच्या मनातील वास्तव= नवी दिल्ली, [१५ एप्रिल] - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या क्षमतेवर पक्षातील बहुतेक सर्वच वरिष्ठ ...

×