Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहतशवादामुळेच द्विपक्षीय संबंध बिघडले

दहतशवादामुळेच द्विपक्षीय संबंध बिघडले

=अमेरिकेने पाकला सुनावले=
usa-pakistan flagsवॉशिंग्टन, [१८ जून] – पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांसाठी सातत्याने नंदनवन ठरत असल्याने आणि दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात पाक असमर्थ ठरत असल्यानेच अमेरिका आणि पाकमधील द्विपक्षीय संबंध इतके बिघडले आहेत. संरक्षण क्षेत्राकरिता मिळणारी मदत गोठविण्यासारखा कठोर निर्णय घेणे आम्हाला भाग पडले, अशा शब्दात अमेरिकेने पाकला सुनावले आहे.
अमेरिकेसोबतचे संबंध सुरळीत करायचे असतील, तर पाकने त्यांच्या भूमीत असलेल्या दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करायलाच हवी, तसेच आपली भूमी दहशतवाद्यांचे नंदनवन ठरणार नाही, याची ग्वाही देखील द्यायला हवी. याबाबतचा संदेश आम्ही पाकला वारंवार दिला आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने अफगाणिस्तानवरील आपल्या सहामाही अहवालात नमूद केले आहे. शुक्रवारी हा अहवाल कॉंगे्रस सभागृहाकडे पाठविण्यात आला.
पाकने दहशतवाद्यांना आश्रय देणे सुरूच ठेवल्याचा प्रतिकूल परिणाम केवळ द्विपक्षीय चर्चेवरच झाला नाही; तर अफगाणमधील सुरक्षा आणि स्थिरताही धोक्यात आली आहे. अमेरिकेकडून पाकला मिळणारी आर्थिक मदतही याच कारणामुळे बंद झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
अफगाणमधील अमेरिकन हितासाठी धोकादायक असलेल्या हक्कानी नेटवर्कविरुद्ध पाकने कारवाई केली नसल्याचे प्रमाणपत्र अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांनी दिले नसल्याने ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या गेल्या वर्षीच्या सहामाहीतील ३०० दशलक्ष डॉलर्सची मदत गोठविणे आम्हाला भाग पडले होते. अफगाण-पाक सीमा अजूनही हक्कानीसह विविध दहशतवादी गटांसाठी नंदनवनच ठरत आहे. तालिबान, अल् कायदा, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान यासारखे दहशतवादी गट या सीमेतून मुक्तपणे वावर करीत असतात, असा उल्लेखही अहवालात आहे.
आमच्याकडून पाकिस्तानला लाखो डॉलर्सची मदत मिळत असते. पण, हा पैसा सरकारच्या हातात न जाता, थेट गुप्तचर संस्था आयएसआयकडे जातो. तिथून तो तालिबान्यांना मिळतो आणि त्याच पैशातून तालिबान घातक शस्त्रांची खरेदी करून, त्याचा वापर अमेरिकेविरोधात करते, असा आरोपही संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28640

Posted by on Jun 19 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (224 of 2458 articles)


नवी दिल्ली, [१६ जून] - पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काही नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात ...

×