Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण नको

दहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण नको

=माध्यमांसाठी नियमावली जारी=
Minister of State for Information & Broadcasting, Rajyavardhan Rathoreनवी दिल्ली, [२२ मार्च] – राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून माध्यमांनी दहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये, असे स्पष्ट निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने यासंदर्भात नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शन नियमावलीत हे निर्देश देण्यात आले आहेत. अशा घटनांचे प्रक्षेपण करताना तारतम्य बाळगावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनीही केली होती.
जम्मू-काश्मिरात कठुआ आणि सांबा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या कारवाईचे थेट प्रक्षेपण काही खाजगी वाहिन्यांवर करण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. वाहिन्यांनी वार्तांकन करताना कारवाई सुरू असलेले ठिकाण,सहभागी असलेले जवान आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांची क्षमता, कारवाईचा प्रकार आणि धोरण तसेच इतर लष्करी गोष्टींची माहिती दाखवू नये, असे निर्देश या नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. निष्पाप लोकांचे जीव वाचतील आणि दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईतील कोणतीही माहिती लिक होणार नाही, याची दक्षता घेत वृत्त प्रसारित करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिरेक्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईशी संबंधित अधिकारी वेळोवेळी माध्यमांना माहिती देत असतात. कारवाई पूर्ण होईपर्यंत माध्यमांनी अधिकृतपणे मिळालेले वृत्तच दाखवावे. हा अत्यंत संवेदनशील विषय असून त्यात माध्यमांकडून सहकार्य अपेक्षित आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव विमल जुल्का यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21681

Posted by on Mar 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1856 of 2453 articles)


=भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे कुटुंबीय येणार= पुणे, [२२ मार्च] - पंजाबच्या घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशातील अनेक ...

×