Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादाची परिभाषा स्पष्ट व्हायलाच हवी

दहशतवादाची परिभाषा स्पष्ट व्हायलाच हवी

=७० वर्षांनंतरही युनो अपयशी: पंतप्रधान मोदी यांची रोखठोक भूमिका=
narendra modi in unoसॅन जोस, [२८ सप्टेंबर] – संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाली. पण, हे सर्वोच्च जागतिक मंडळ अजूनही दहशतवादाची परिभाषा निश्‍चित करू शकले नाही. दहशतवादी कुणाला म्हणायचे? हे स्पष्ट व्हायलाच हवे, अशी रोखठोक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी विशद केली.
बहुतांश भारतीयांचे वास्तव्य असलेल्या सिलिकॉन व्हॅलीतील आपल्या दोन दिवसीय दौर्‍याचा समारोप करताना ‘सॅप’ सेंटरमध्ये आयोजित हजारो भारतीयांच्या बैठकीला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण जगापुढे आव्हान ठरलेल्या दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी संयुक्त मुकाबला करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
भारत गेल्या ४० वर्षांपासून दहशतवादाचा बळी ठरला आहे. भारतातील हा दहशतवाद शेजारील देशांचीच देण आहे. अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांना भारतविरोधी दहशतवादी कारवायांची परिपूर्ण कल्पना होती. पण, जेव्हा त्यांच्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले… निष्पाप लोकांचे बळी गेले, तेव्हाच त्यांना जाग आली. दहशतवाद किती भयंकर आहे, याची जाणीव त्यांना तेव्हा झाली, असे मोदी यांनी सांगितले.
एकविसावे शतक हे आशियाचे आणि विशेषत: भारताचे आहे. या शतकावर दहशतवादाचे सावट राहणार नाही, याची काळजी आपण घ्यायलाच हवी. उद्या मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शांतता मिशनमध्ये मी याबाबत आपली बाजू स्पष्टपणे मांडणार आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण जगानेच संघटित होण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.
दहशतवाद म्हणजे काय, दहशतवादी कुणाला म्हणायचे, याबाबतची परिभाषा निश्‍चित करण्यासाठी आता आपण वेळ घालवायला नको, असे सांगताना, भारत ही महात्मा गांधी आणि गौतम बुद्धाची भूमी आहे. या दोघांनीही जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. दहशतवादी कुणालाही, कधीही आणि कुठेही हानी पोहोचवू शकतात, याची जाणीव जगाला व्हायलाच हवी. त्यामुळे एकविसावे शतक दहशतवादमुक्त राहील, याची काळजीही आपण घ्यायलाच हवी, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24093

Posted by on Sep 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1403 of 2458 articles)


सुरक्षा परिषदेचा विस्तार आवश्यक  ‘जी-४’ देशांच्या परिषदेत पंतप्रधानांची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघ, [२६ सप्टेंबर] - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार ...

×