Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादाचे करणार समूळ उच्चाटन

दहशतवादाचे करणार समूळ उच्चाटन

=अमेरिकेची कडक भूमिका, लाहोर आत्मघाती हल्ला प्रकरण, बळीसंख्या ७२=
white-houseवॉशिंग्टन, [२८ मार्च] – पाकिस्तानातील लाहोरमध्ये रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्याची अमेरिकेने कठोर शब्दात निंदा केली असून त्या परिसरात फोफावलेला दहशतवाद पाकच्या मदतीनेच मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. दरम्यान, काल रविवारी झालेल्या या आत्मघाती हल्ल्यातील बळींची संख्या वाढून ७२ पर्यंत गेली असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये ख्रिश्‍चन समुदायाच्या लोकांचा मोठ्याप्रमाणावर समावेश असल्याचीही माहिती आहे.
लाहोर येथे रविवारी झालेल्या स्फोटात अनेक निरपराध लोकांचा बळी घेणार्‍या या घटनेची व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते नेड प्राईड यांनी कठोर शब्दात निंदा केली आहे.
अशा कठीण प्रसंगी अमेरिका पाकिस्तानच्या पाठीशी उभी असून तेथे उद्‌भवलेला दहशतवाद पाकच्याच मदतीने समूळ नष्ट करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जमातुल अहरारने स्वीकारली जबाबदारी
लाहोर येथील इक्बाल पार्क येथे रविवारी झालेल्या आत्मघाती स्फोटाची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानपासून (टीटीपी) वेगळ्या झालेल्या जमातुर अहरार या संघटनेने स्वीकारली आहे. या घटनेतील हल्लेखोर फक्त २० वर्षे वयाचा होता, असे सांगण्यात आले.
शरीफ यांनी ब्रिटन दौरा केला स्थगित
लाहोर येथील स्फोटात मृतांचा आकडा आता ७२ झाला असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाकिस्तानात तीन दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपला ब्रिटन दौरा स्थगित केला आहे.
लाहोर येथे झालेल्या स्फोटात बहुसंख्य ख्रिश्‍चन लोक मारले गेल्याने कॅथालिक ख्रिश्‍चनांचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकन सिटीने या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केल्याचे वृत्त आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27620

Posted by on Mar 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (560 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२८ मार्च] - पर्यावरणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. असे नुकसान ...

×