Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादात फरक करू नका

दहशतवादात फरक करू नका

=ओबामा यांची शरीफांना तंबी=
A tear runs down the face of U.S. Democratic presidential nominee Obama during a campaign rally in Charlotteवॉशिंग्टन, [२४ ऑक्टोबर] – तुमच्या देशात बॉम्बस्फोट करणारे आणि भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणारे, असा फरक दहशतवादी गटांमध्ये करू नका, दहशतवाद कोणत्याही स्वरूपात असो, तो दहशतवादच असतो, अशी कडक तंबी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दिली आहे.
ओबामा आणि शरीफ यांच्यात ओव्हल येथे गुरुवारी सुमारे दीड तास बैठक झाली. यात ओबामा यांनी स्पष्ट केले की, पाकने दहशतवादी गटांमध्ये अजिबात फरक करायला नको. यापूर्वीही अमेरिकेने हीच बाब विशद केली आहे आणि आताही पाकला तीच आठवण पुन्हा एकदा करून दिली आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी विभागाचे उपसचिव एरिक शल्ट्‌झ यांनी आज शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
केवळ पाकच्या भूमीत हल्ले करणार्‍या दहशतवादी गटांनाच पाक लक्ष्य बनवित आहे आणि भारतविरोधी कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना हा देश आपल्या भूमीत आश्रय देत आहे. ते पाकचे नागरिक असल्याचे सांगत आहे. दहशतवादातील हा फरक अमेरिका कदापि मान्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पाकमधील नागरिकांचा विकास, या देशात लोकशाही प्रस्थापित करणे आणि एका सभ्य समाजाची निर्मिती करणे, यासाठी पाकसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. दहशतवादी कारवायांमुळे आज पाकिस्तानी नागरिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या दहशतवादाविरोधात पाकने अतिशय कठोर पावले उचलण्याची गरज आहे, असे ओबामा यांचे ठाम मत असल्याचे एरिक यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25293

Posted by on Oct 25 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1295 of 2458 articles)


मुंबई, [२३ ऑक्टोबर] - नैतिक, धार्मिक आणि मानवकल्याणासाठी भारताने जगाचे नेतृत्व करायचे आहे. सामर्थ्यशील नेतृत्व करणारी माणसे तयार करणे व ...

×