Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादामुळे आर्थिक विकास मंदावला

दहशतवादामुळे आर्थिक विकास मंदावला

World-Bankवॉशिंग्टन, [६ फेब्रुवारी] – युद्ध आणि दहशतवादामुळे आखाती देश आणि उत्तर आफ्रिकेमधील आर्थिक विकासाची गती मंदावली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. २०१५ या वर्षात या भागातील आर्थिक विकासाचा वेग २.८ टक्के अपेक्षित असताना तो २.६ टक्क्यांच्या पुढे जाऊ शकला नाही.
सीरियामध्ये गेल्या पाच वर्षांपासून अराजकता असून, या देशाला लागून असलेल्या इतर देशांनाही दहशतवादाचा फटका बसला आहे. यामुळे सीरियाचे तब्बल ३५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. हे नुकसान सीरियाच्या एकून उत्पन्नाइतके आहे. सततचे युद्ध आणि दहशतवादाशिवाय तेलाच्या किमतीत झालेली घसरणही आर्थिक मंदीला कारणीभूत ठरली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी कच्च्या तेलाची येथील किंमत प्रतिबॅरल १०० डॉलर होती. ती आता फक्त तीस डॉलर झाली आहे. यामुळे तेल निर्यातदारांना प्रचंड फटका बसला आहे. परिणामी सरकारचाही महसूल बुडत आहे.
सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि संयुक्त अरब अमिरात या श्रीमंत तेल निर्यातदार देशांनाही फटका बसत आहे. त्यांच्याकडे आर्थिक संपन्नता असली, तरी तेही फक्त आणखी काही वर्षेच हा तोटा सहन करू शकतात, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. सध्याची स्थिती पाहता, सौदी अरेबिया २०२० पर्यंत अडचणीत येऊ शकते. त्यामुळेच अझरबैजान, नायजेरिया आणि अंगोलासारख्या तेलउत्पादक देशांना कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय वाढविण्याचा जागतिक बँक प्रयत्न करत आहे.
सीरियाला बसलेला फटका
जागतिक बँकेच्या अहवालानुसार सीरियामधील फक्त सहा मोठ्या शहरांमधील नुकसानीचा आकडा ४.५ अब्ज डॉलरपर्यंत जात आहे. येथील पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, पाणी, शिक्षण, वाहतूक या सेवा कोलमडल्या आहेत. येमेनमध्येही जवळपास पाच अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या देशांमधील जवळपास निम्मी मुले-मुली गेल्या दोन वर्षांपासून शाळेत जाऊ शकलेली नाहीत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26748

Posted by on Feb 7 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (857 of 2458 articles)


लंडन, [६ फेब्रुवारी] - विवाहबंधनातील जोडीदार आजकाल एकमेकांशी मित्रत्वाचे नाते असल्याचे सांगताना आढळतात. त्यामुळे एकमेकांना अनेक बाबतीत गृहीत धरण्याबरोबरच ...

×