Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » दहशतवादामुळे चर्चा थांबणार नाही : आसिफ

दहशतवादामुळे चर्चा थांबणार नाही : आसिफ

APP42-31 ISLAMABAD: July 31 - Federal Minister for Water and Power, Khawaja Muhammad Asif addressing a press conference regarding the energy policy. APP

इस्लामाबाद, [९ जानेवारी] – भारत-पाकिस्तान चर्चेत कोणत्याही अतिरेकी संघटनेला वितुष्ट आणण्याची परवानगी नाही, असा कडक इशारा पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाक रेडिओच्या माध्यमातून शनिवारी दिला.
पाकिस्तान कोणत्याही प्रकारे दहशतवादाचे समर्थन करीत नाही, किंबहुना प्रत्येक अतिरेकी हा मानवतेचा शत्रू आहे, असे पाकचे मत आहे, अशा ठाम शब्दात त्यांनी दहशतवादाविरुद्ध पाकची भूमिका मांडली. भारत-पाक शांतता चर्चेदरम्यान काही घटकांकडून घातपातची शक्यता असली तरीही ते त्यांच्या या नीच हेतूंमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत, असे मत काही दिवसांपूर्वी आसिफ यांनी व्यक्त केले होते.
गेल्याच आठवड्यात काही सशस्त्र अतिरेक्यांनी पठाणकोट हवाईतळावर हल्ला केला. या सर्व अतिरेक्यांनी पाकिस्तानातून घुसखोरी केली असावी आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार मौलाना मसूद अझर याच्या नेतृत्वाखाली जैश-ए-मोहम्मद संघटनेचेच हे अतिरेकी असावेत, असा कयास बांधण्यात येत आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये राबवण्यात आलेल्या झर्ब-ए-अझब ऑपरेशनद्वारे येथील अनेक अतिरेकी संघटना नष्ट करण्यात आपण बर्‍याच अंशी यश मिळवले आहे व यापुढेही हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्याने अन्य अतिरेकी संघटनाही आपण लवकरच उद्ध्वस्त करू, असा इशाराही आसिफ यांनी जीओ टीव्हीशी बोलताना दिला.
… तर लष्करी मदत नाही; अमेरिकेचा पाकला इशारा
पाकने जर पठाणकोट हल्ल्याचे सूत्रधार असलेल्या अतिरेक्यांविरुद्ध ठोस कारवाई केली नाही तर ओबामा प्रशासनाला भविष्यात पाकला लष्करी मदत करण्याबाबत फेरविचार करावा लागेल. अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांसाठी हा कसोटीचा काळ आहे. असे असले तरीही पाकच्या सर्वच मुद्यांवर अमेरिका सहमत असेलच असे नाही, त्यामुळेच आता पाकने त्यांच्या शब्दावर ठाम राहत कृती करून दाखवली पाहिजे, असा इशारा अमेरिकेने पाकला दिला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26458

Posted by on Jan 10 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (934 of 2458 articles)


=जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरला अटक होणार= नवी दिल्ली, [९ जानेवारी] - पठाणकोट वायुसेनेच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पणाला लगलेली ...

×