Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » दहशतवादाविरोधात कठोर संदेश देण्याची गरज

दहशतवादाविरोधात कठोर संदेश देण्याची गरज

=पंतप्रधान मोदी यांचे बान की मून यांना पत्र=
pm-narendra-modiसंयुक्त राष्ट्रसंघ, [१८ सप्टेंबर] – जगाच्या पाठीवर कुठेही दहशतवाद मान्य केला जाणार नाही, असा कठोर संदेश ७० व्या वर्षांत पदार्पण करीत असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाने देण्याची नितांत गरज आहे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना पाठविलेल्या पत्रात विशद केली आहे. सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रमांतर्गत पूर्ण करायलाच हवी. भारत हा स्थायी सदस्यत्वाचा दावेदार आहे आणि एकविसाच्या शतकाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताला स्थायी सदस्यत्व मिळणे अतिशय आवश्यक आहे, यावरही पंतप्रधानांनी भर दिला.
दुसर्‍या जागतिक महायुद्धाच्या राखेतून संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म झाला असल्याने या जागतिक संस्थेने जागतिक सुरक्षेपुढील या नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलायला हवी. दुर्दैवाने काही देशांनी दहशतवादालाच आपले मुख्य धोरण बनविले आहे. त्या देशातील लष्कराची जागाही दहशतवाद्यांनी घेतली आहे. आपल्या शेजारील देशांवर हल्ला करण्यासाठी लष्कराऐवजी दहशतवाद्यांचाच वापर केला जात आहे, याकडे पंतप्रधानांनी आपल्या पत्रात पाकचा उल्लेखही न करता बान की मून यांचे लक्ष वेधले.
हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाकरिता ऐतिहासिक असेच असल्याने, आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात सर्वंकष धोरण स्वीकारणे गरजेचे आहे, असेही मोदी यांनी पत्रात म्हटले आहे. मोदी यांचे हे पत्र भारताचे येथील स्थायी दूत अशोककुमार मुखर्जी यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सादर केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबर रोजी युनोत जाणार आहेत. त्यानंतर ते बहुतांश भारतीयांचे वास्तव्य असलेल्या सिलिकॉन व्हॅलीलाही भेट देणार आहेत. तथापि, आमसभेच्या अनुषंगाने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23884

Posted by on Sep 19 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1457 of 2458 articles)


=दक्षिणेतील मौलवींचे आवाहन= हैदराबाद, [१८ सप्टेंबर] - काही राज्यांमध्ये गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी आणि त्यातच मुस्लिमांचा ईद-उल-अझा हा सण अवघ्या ...

×