Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच!

दहशतवादाविरोधात जग एकवटले, तरी पाकची नकारघंटाच!

=शरीफांच्या भाषणावर भारताचे टीकास्त्र=
vikas swaroopनवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – एकीकडे संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकवटत असताना दुसरीकडे पाकिस्तान मात्र याबाबत नकारघंटाच वाजवत आहे, या शब्दांत भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी युनोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणावर खरपूस टीका केली.
नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणातील ८० टक्के वेळ जम्मू-काश्मिरात भारताकडून होणार्‍या कथित मानवाधिकार उल्लंघनाबाबत खर्ची घातला. मात्र, इतर कोणत्याही देशाने युनोत केलेल्या भाषणात याचा साधा उल्लेखही केला नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी गुरुवारी सांगितले. गेल्या दोन दिवसांत ५० जागतिक नेत्यांनी युनोच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण केले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर कडाडून टीका करताना स्वरूप म्हणाले की, इतर देशांनी युनोत केलेल्या प्रत्येक निवेदनात दहशतवाद हा जागतिक शांततेला असलेला सर्वात मोठा धोका असल्याचे मान्य केले. परंतु, पाकिस्तान अजूनही ही बाब समजून घ्यायला तयारच नाही. नुकत्याच झालेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारत-पाक यांच्यातील सिंधू पाणीवाटप करारावर पुनर्विचार करणार का, असे विचारले असता, कोणत्याही कराराची अंमलबजावणी करण्याकरिता परंस्पर विश्‍वास आणि सहकार्याची गरज असते, असे स्वरूप म्हणाले. या ऐतिहासिक करारार १९६० मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती.
नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे खोर्‍यातील कथित अत्याचारांबाबत जे दस्तावेज सोपविले त्याचा युनोच्या सरचिटणीसांच्या निवेदनात कुठेही उल्लेख नाही.
युनोकडून मध्यस्थी करण्याबाबतही काहीच उल्लेख नाही, याकडेही स्वरूप यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानकडून केल्या जाणार्‍या अत्याचारांबाबत भारतही दस्तावेज तयार करणार का, असे विचारले असता, आम्हाला त्याची काहीच गरज नाही, असे स्वरूप म्हणाले. दहशतवादाला खतपाणी घालण्याबाबत पाकच्या भूमिकेची संपूर्ण जगाला कल्पना आहे. सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवादी कारवाया करणार्‍या गटांवर कारवाई करण्याची जबाबदारी पाकची आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29288

Posted by on Sep 23 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (96 of 2453 articles)


=राजनयिक संबंध असलेल्या सर्व राष्ट्रांशी संपर्क= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] - भाजपाप्रणीत रालोआ सरकारमधील मंत्र्यांनी भारतासोबत राजनयिक संबंध असलेल्या सर्व ...

×