Home » ठळक बातम्या, वाणिज्य » दहाच्या नोटा इतिहासजमा होणार

दहाच्या नोटा इतिहासजमा होणार

=नाणी चलनात राहणार=
नवी दिल्ली, (१६ मार्च) – विवाह समारंभ किंवा धार्मिक उत्सवात आरास करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या दहाच्या नोटा लवकरच इतिहासजमा होणार असल्याने आता यासाठी २० किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याच्या नोटा वापराव्या लागतील. दहाच्या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी नाणी मात्र कायम राहणार आहेत.
२० रुपयाच्या नोटा चलनात असल्या तरी त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. २० नंतर थेट ५० रुपयांचीच नोट चलनात आहे. खिशात ठेवून या नोटांचे आयुष्य कमी होते आणि त्या छापण्यासाठी मूल्यापेक्षा जास्त खर्च होत असल्यामुळे दहाच्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार आहेत. नाण्यांच्या बाबतीत मात्र असे होत नाही. सध्या चलनात असलेले सर्वांत कमी मूल्याचे नाणे ५० पैशांचे आहे. २५ पैशांचे नाणे सरकारने २०११ मध्येच बंद केले आहे. पाच शतकांपूर्वी अकबराचे राज्य असताना ५० पैशांचे नाणे चलनात आले होते. त्या जमान्यात एक रुपयाचा शिक्का बनविण्यासाठी ११ ग्रॅम चांदीचा वापर केला जात असे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=11957

Posted by on Mar 17 2014. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (2435 of 2455 articles)


बीड, (१५ मार्च) - गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात वादळ-वार्‍यासह झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच ...

×