किमान तापमान : 31.03° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 6.97 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.05°C - 32.99°C
scattered clouds28.12°C - 30.79°C
sky is clear27.62°C - 30.6°C
sky is clear28.38°C - 31.86°C
few clouds28.92°C - 33.1°C
sky is clear29.22°C - 32.93°C
few cloudsपुणे, [६ जून] – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या सोमवारी ८ जूनला दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ नंतर निकाल पाहता येणार आहे.
यंदा दहावीच्या निकालाला विलंब झाल्यामुळे निकालाच्या तारखेवरून घोळ निर्माण झाला होता. सोशल साइटवर विविध तारखा जाहीर होत होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हणाणे यांनी आज शनिवारी निकालाची तारीख जाहीर केली. ८ जूनला ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर १५ जूनला शाळेमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत.
यंदा राज्यातील नऊ विभागातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागांचा एकाच दिवशी म्हणजे ८ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.