Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » दहावीपर्यंत नैतिक विज्ञान अनिवार्य!

दहावीपर्यंत नैतिक विज्ञान अनिवार्य!

=सुप्रीम कोर्टाची केंद्र, सीबीएसईला नोटीस=
supreme_court_1नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नैतिक विज्ञान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे.
महिला वकील संतोष सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. ए. के. सिकरी यांचा समावेश असलेल्या दोन सदस्यीय न्यायासनाने केेंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालय आणि केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नोटीस जारी केली. राष्ट्रहितात राष्ट्रीय मूल्य जोपासण्यासाठी आणि नैतिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नैतिक विज्ञान हा विषय समाविष्ट करण्याचे आदेश आता न्यायालयानेच केंद्र सरकार व सीबीएसईला द्यावे, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.
समाजातून नैतिक मूल्यांचा झपाट्याने र्‍हास होत आहे. पैसा कमविणे हाच प्रत्येकांच्या आयुष्याचा एकमेव उद्देश झाला आहे. अशा स्थितीत नैतिक शिक्षणावर आधारित शिक्षण प्रणालीची देशाला आणि समाजाला गरज आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20246

Posted by on Feb 3 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2132 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] - राजधानी दिल्लीचा विकास फक्त भाजपाच करू शकते, त्यामुळे दिल्लीत भाजपाला विजयी करा, असे आवाहन करताना ...

×