Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दहावी, बारावीच्या गुण प्रणालीत बदल?

दहावी, बारावीच्या गुण प्रणालीत बदल?

=लेखी परीक्षेत किमान २० गुण आवश्यक, राज्य शिक्षण मंडळाचा प्रस्ताव=
MSBSHSE_logoकोल्हापूर, [२७ एप्रिल] – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आगामी शैक्षणिक वर्षापासून दहावी आणि बारावीच्या गुण प्रणालीत बदल करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान २० गुण मिळविणे अनिवार्य होणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील सूत्राच्या मते, मंडळाच्या या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय विभागीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती आज सोमवार आणि उद्या या प्रस्तावावर चर्चा करणार असून, त्यानंतर आपल्या शिफारशी सादर करणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या परीक्षा सत्रापासूनच तो अमलात आणला जाईल.
विद्यमान नियमानुसार, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी त्या विषयाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत एकूण ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. पण, आता नव्या प्रस्तावानुसार, उत्तीर्ण होण्यासाठी असलेल्या या ३५ टक्के गुणांपैकी केवळ लेखी परीक्षेत विद्यार्थ्याला २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य होणार आहे. लेखी परीक्षेत २० टक्के गुण न मिळाल्यास विद्यार्थी त्या विषयात अनुत्तीर्ण मानला जाणार आहे.
सध्या दहावीच्या परीक्षेतील सर्वच विषयांमध्ये लेखी परीक्षा ८० आणि प्रात्यक्षिक परीक्षा २० गुणांची आहे. तर, बारावी परीक्षेत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांची लेखी परीक्षा ७० आणि प्रात्यक्षिक परीक्षा ३० गुणांची आहे. आता, दहावी आणि बारावीसाठी गुणांची नवी पद्धत सादर करण्यात आली आहे. याच शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू करण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न राहणार आहे, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22333

Posted by on Apr 28 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1740 of 2451 articles)


=महाविनाश तोंडावर! : भूगर्भाचा अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांचे मत= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - नेपाळला गेल्या शनिवारी ७.९ इतक्या रिश्टर स्केल ...

×