Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दहा कर्मचारी असले तरी मिळणार ‘पीएफ’

दहा कर्मचारी असले तरी मिळणार ‘पीएफ’

EPFO-Indiaनवी दिल्ली, [१२ मार्च] – जर कंपनीमध्ये दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असतील, तर त्यांनाही भविष्यनिर्वाह निधी लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयातर्फे या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सध्या २० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणार्‍या कंपन्यांना भविष्यनिर्वाह निधी राखून ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र आता दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणार्‍या कंपन्यानाही पीएफ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे व्यवस्थापन करणार्‍या ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’ च्या तिजोरीतील निधी वाढून २० लाख कोटी रूपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
यामुळे अधिकाधिक कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. हा नियम लागू झाल्यास ५० लाख कर्मचारी ईपीएफओअंतर्गत येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27256

Posted by on Mar 13 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (683 of 2453 articles)


मुंबई, [१२ मार्च] - मार्च महिना सुरू होताच ग्रामीण महाराष्ट्रापाठोपाठ दुष्काळाच्या झळा शहरातही पोहोचल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकार समुद्रातल्या पाण्याचा ...

×