Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दाऊद पाकमध्येच, पकडून भारतात आणू

दाऊद पाकमध्येच, पकडून भारतात आणू

=राजनाथसिंह यांचा निर्धार=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [११ मे] – अंडरवर्ल्डचा पळपुटा डॉन आणि मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच आहे आणि त्याला पकडून भारतात आणण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी लोकसभेत व्यक्त केला.
दाऊद पाकच्याच आश्रयात आहे, याची माहिती संपूर्ण जगाला आहे. त्याच्या ठावठिकाण्याचे ठोस पुरावेही आम्ही दिले आहेत. दाऊदला भारतात आणण्यासाठी एकतर आम्ही पाकचे मन वळविण्याचा प्रयत्न करू आणि त्यात यश आले नाही, तर पाकवर दबाव आणू. पण, दाऊदला आणल्याशिवाय आपले सरकार शांत बसणार नाही, असे राजनाथसिंह यांनी सभागृहात स्पष्ट केले.
दाऊद पाकच्या कोणत्या शहरात आहे, याबाबतचे ठोस पुरावे आम्ही पाक सरकारला दिले आहेत. पण, दाऊद पाकमध्ये नाहीच, असेच या देशाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर पाकने दाऊदला हुडकून काढायला हवे आणि मुंबई बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी त्याला भारताच्या स्वाधीन करायला हवे, अशी आमची अपेक्षा आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
इंटरपोलने दाऊदविरोधात जारी केलेला रेड कॉर्नर नोटीस १९९६ पासून प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही त्याच्याविरोधात २००६ मध्ये विशेष नोटीस जारी केली होती. आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, असे वचन पाक सरकारने संपूर्ण जगाला दिले असल्याने, पाकने या वचनाचे पालन करावे आणि दाऊदसोबतच भारताच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ यादीतील दहशतवाद्यांना भारताच्या सुपूर्द करावे, असेही त्यांनी सांगितले.
केवळ दाऊदच नव्हे, तर भारतातील विविध बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असलेल्या आणि २६/११ रोजीच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना भारतात आणण्यासाठी आपले सरकार पाकवर सातत्याने दबाव आणत राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22503

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1707 of 2453 articles)


पुणे, [१० मे] - अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिंदुमाधव जोशी यांचे ...

×