Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » दाऊद पाकिस्तानमध्येच – पुरावे प्रसिद्ध

दाऊद पाकिस्तानमध्येच – पुरावे प्रसिद्ध

dawood-ibrahim-old, newनवी दिल्ली, [२२ ऑगस्ट] – कुख्यात गुंड दाऊद इ्रबाहिम पाकिस्तानमध्येच असल्याचे ठोस पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागले असून ते प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कराची शहरात दाऊद आपल्या कुंटुंबियांसह राहत असल्याचे उघड झाल्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा समोर आला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्तात हा खुलासा करण्यात आला आहे. दाऊदच्या पत्नीच्या नावावर असलेल्या फोनबिलवरून हे पुरावे मिळाले आहेत. दाऊद पत्नी, तीन मुली आणि एका मुलासह कराचीजवळच्या क्लिफटनमध्ये राहत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेला दाऊदचा पाकिस्तानमधील पत्ता, फोनबील, पासपोर्ट ही महत्वाची कागदपत्रे मिळाली आहेत.
हे सर्व पुरावे दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिच्या नावावर असलेल्या फोनबिलवरून मिळाले आहेत. तसेच सध्या दाऊद कसा दिसतो याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला आहे. दाऊदच्या कुटुंबियांच्या कराची – दुबई प्रवासाची कागदपत्रे हाती लागली आहेत. सध्या त्याच्याकडे तीन पाकिस्तानी पासपोर्ट, कराची येथील घरासहित इतर अजून दोन ठिकाणी असलेले घर. तसेच रिअल इस्टेट, बनावट नोटा, भारतीय चित्रपट पायरसीत डी कंपनीने पैसे गुंतवल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23674

Posted by on Aug 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1510 of 2453 articles)


=राजनाथसिंह यांची भूमिका= लखनौ, [२२ ऑगस्ट] - भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) बैठकीत केवळ दहशतवाद हाच एकमेव मुद्दा राहणार आहे. ...

×