Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दाऊद रोज भारतीय नेत्यांना फोन करतो!

दाऊद रोज भारतीय नेत्यांना फोन करतो!

=हॅकर्सचा दावा=
dawood ibrahimनवी दिल्ली, [२७ एप्रिल] – गँगरीनने शेवटचा टप्पा गाठल्याने सध्या आयुष्यासाठी संघर्ष करीत असलेला अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन आणि मार्च १९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातील आपल्या घरून दररोज काही भारतीय नेत्यांशी फोनवरून बोलत असतो, असा दावा त्याचा फोन हॅक करणार्‍या दोन हॅकर्सने केला आहे.
मनीष बागले आणि जयेश शाह असे या हॅकर्सचे नाव आहे. त्यांच्या मते, दाऊदचा मुक्काम कराचीतच असून, त्याच्या घरात चार दूरध्वनी क्रमांक आहेत. दाऊदची पत्नी मेहजबी शेखच्या नावावर चारही दूरध्वनी आहेत. या चारही क्रमांकांची माहिती काढल्यानंतर तो भारतात दूरध्वनी करीत असल्याचे दिसून आले.
दाऊदच्या चारही दूरध्वनी क्रमांकांची ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळातील माहिती समोर आली आहे. सर्वाधिक दूरध्वनी केलेल्या पहिल्या दहामध्ये भारतातील पाच दूरध्वनी क्रमांकांचा समावेश आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा याबाबत चौकशी करीत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दाऊदच्या संपर्कात असलेल्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28033

Posted by on Apr 28 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (424 of 2453 articles)


=प्राची साध्वी विधानावर ठाम, माफी मागण्यास नकार= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] - संसदेत बसलेले काही जण दहशतवादी आहेत, या आपल्या ...

×