Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » दाऊद ‘साहेब’ आमच्या देशात नाही

दाऊद ‘साहेब’ आमच्या देशात नाही

=पाकी उच्चायुक्ताचे अजब वक्तव्य=
Abdul_Basit_PAKनवी दिल्ली, [११ मे] – केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा दावा केला असतानाच, पाकचे नवी दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दाऊदला चक्क ‘साहेब’ असे संबोधून तो आमच्या देशात नाही, असे सांगितले.
दाऊद हा पाकमध्येच असल्याचा दावा भारत सरकारकडून वारंवार करण्यात येतो. पण, आम्ही प्रत्येक वेळी या दाव्याचे खंडन करीत असतो. मला आज एवढेच सांगायचे आहे की, दाऊद साहेब आमच्या देशात नाही, असे बासित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जम्मू-काश्मिरात गेल्या वर्षी अतिशय शांततेत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या राज्यातील नागरिकांना सार्वमत हवे आहे. त्यावर निवडणुका हा पर्याय ठरूच शकत नाही. काश्मिरींना भारतापासून मुक्ती हवी आहे. जम्मू-काश्मीर हा स्वतंत्र प्रदेश असावा, अशी येथील नागरिकांची इच्छा असल्याने तिथे विधानसभेची निवडणूक घेण्यात काहीच अर्थ नाही, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22506

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1706 of 2453 articles)


=राजनाथसिंह यांचा निर्धार= नवी दिल्ली, [११ मे] - अंडरवर्ल्डचा पळपुटा डॉन आणि मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार ...

×