Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » दादरी, गुलामअली घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न

दादरी, गुलामअली घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न

=पंतप्रधानांचा थेट आरोप=
narendra modi33कोलकाता, [१४ ऑक्टोबर] – उत्तरप्रदेशच्या दादरी येथील हत्याकांड आणि पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होणे यासारख्या घटना अतिशय दुर्दैवी अशाच आहेत. काही राजकीय पक्षांनी मात्र मतांचे राजकारण करण्यासाठी या घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांशी केंद्राचा काहीही संबंध नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्यक समाजाच्या भावना भडकावून व्होटबँकेचे राजकारण करण्याची काही राजकीय पक्षांनी फार जुनीच सवय आहे. आताही तेच प्रकार सुरू झाले आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे हे पक्ष जातीयवादी राजकारण करण्याची एकही संधी सोडत नाही, अलीकडील काळात ज्या घटना घडल्या त्या निषेधार्ह आहेतच. पण, त्या घटनांचा संबंध केंद्र सरकारशी जोडणे मुळीच योग्य नाही. भाजपा केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वीही देशात अशा प्रकारच्या घटना घडत आल्या आहेत. त्यावेळी ढोंगी धर्मनिरपेक्षवादी शांत राहायचे. आता भाजपा सत्तेवर असल्याने ते या घटनांना जातीय रंग देत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी ‘आनंद बाजार पत्रिका’ या बंगाली दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून एका मुस्लिम व्यक्तीची दादरी येथे हत्या करण्यात आली होती. तर, गेल्या आठवड्यात पाकचे गायक गुलाम अली यांचा मुंबई येथील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द करावा लागला होता. हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा दारिद्र्याविरोधात संयुक्त लढा द्यावा, असे आवाहन त्यावेळी पंतप्रधानांनी केले होते.
आपल्या देशात अशा घटना नेहमीच घडत आल्या आहेत. भाजपाने अशा घटनांच कधीच पाठराखण केली नाही. पण, विरोधक भाजपाला बदनाम करण्यासाठी या घटनांना जातीय रंग देतात, असा आरोप करताना हे जातीयतेचे राजकारण नव्हे का, असा सवालही पंतप्रधानांनी केला. जे लोक देशात अपप्रचार करतात त्यांना अल्पसंख्यकांचा विकास मान्यच नसतो. अल्पसंख्यकांकडे त्यांनी नेहमीच केवळ व्होटबँक म्हणूनच पाहिले आहे, अशी चपराकही पंतप्रधानांनी हाणली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25142

Posted by on Oct 15 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1335 of 2453 articles)


=पुरस्कार परत करणार्‍यांना साहित्यिकांचा सवाल= नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] - साहित्य अकादमीतील पदांचा राजीनामा देण्यास पुरस्कार परत करणारे स्वयंघोषित साहित्यिक ...

×