दारिद्र्य निर्मुलनात भारताची मोठी भरारी
Thursday, April 23rd, 2015=६३ वरून आला ५३ व्या स्थानावर=
नवी दिल्ली, [२२ एप्रिल] – आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत भारताने दारिद्र्य निर्मुलनात मोठी भरारी घेतली आहे. आतापर्यंत ६३ व्या स्थानावर असलेला भारत आता ५३ स्थानी आला आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेने अनेक ठोस पावले उचलण्यात आली आहेत. कुपोषणाची समस्या लक्षात घेऊन यामुळे होणारा मृत्यूदर रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश मिळत असून, याचे सकारात्मक परिणाम आता दिसून लागले आहे. तथापि, नेपाळ आणि श्रीलंकेचा विचार केल्यास भारताला या क्षेत्रात अजूनही बरेच काही करण्याची गरज असल्याचे दिसून येते. भारतात दारिद्र्याचे प्रमाण कमी होत असतानाच, शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेशात दारिद्र्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर गेले असल्याचे ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालातील आकडेवारीनुसार भारतात आजही १९ कोटी जनता उपाशी पोटीच झोपत असते. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३०.७ टक्के मुलांचे वजन अतिशय कमी आहे. तर, ५८ टक्के मुलांचा विकास दोन वर्षे वय असतानाच थांबतो आणि तीन हजार मुलांचा मृत्यू कुपोषणामुळे होणार्या आजारांने होत असतो. या अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात दारिद्र्य रेषेखालील कुटुंब जेवण आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी आपल्या एकूण उत्पन्नातील ७० टक्के रक्कम खर्च करते. तर, दारिद्र्यरेषेवरील परिवार यासाठी आपल्या उत्पन्नातून ५० टक्के रक्कम खर्च करीत असते.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22227

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!