Home » ठळक बातम्या, विदर्भ » दारूबंदी झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील

दारूबंदी झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील

=डॉ. अभय बंग यांचे प्रतिपादन , यवतमाळहून पदयात्रा नागपुरात दाखल=
abhay bangनागपूर, [९ डिसेंबर] – दारू प्यायल्याने अनेक संसार उघड्यावर येत आहेत, तरीही शासनाकडून दारूबंदीसाठी कुठलाही पुढाकार घेतला जात नाही. ही शोकांतिका आहे. आता महाराष्ट्र मद्यराष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. हा प्रकार गंभीर असून, दारूबंदी झाल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील, असे प्रतिपादन प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
यवतमाळ हा जिल्हा एकेकाळी हरितक्रांतीचा उद्गाता समजला जात होता. आता यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांकरिता गाजत आहे. ही अतिशय दु:खद बाब आहे. आत्महत्या व दारू वा कर्ज व दारू यांचे निकटचे संबंध आहे. कर्जमुक्तीकरिता शासन विचार करते तेव्हाच त्यांनी दारूबंदीकडे लक्ष द्यावे. स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान यवतमाळ येथील हजारो महिला नागपुरात आल्यानंतर त्यांच्या मोर्चाला डॉ. अभय बंग, डॉ. अविनाश सावजी, महेश पवार संबोधित करीत होते.
डॉ. अभय बंग म्हणाले, राज्याचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी इतर मार्ग सापडू शकतील. परंतु उद्ध्वस्त संसार आणि अंध:कारमय भविष्य सावरण्याकरिता काय किंवा गेलेेले जीव परत येणार आहेत का, हे प्रश्‍न आता तातडीने सोडविणे गरजेचे आहे. दारूमुळे मिळत असलेला महसूल बंद होण्यात राज्याचे आर्थिक नुकसान असल्याचे कारण शासन पुढे करते. पण, हजारो लाखो कुटुंबीयांवर दारूमुळे वाईट परिणाम होतात. त्याचा कुणीही विचार करायला तयार नाही. राज्याचे नुकसान होत असेल तर ते भरून काढण्यासाठी विविध मार्ग मिळतील, असे मत डॉ. अविनाश सावजी यांनी मांडले.
स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान यवतमाळ येथील ३०० महिला गेल्या ५ दिवसांपासून पदयात्रा करीत नागपुरात दाखल झाल्या. याच महिलांच्या मोर्चाला त्यांनी संबोधित केले.
यवतमाळ जिल्ह्यात स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानांतर्गत गेल्या ९ महिन्यात २३ विविध आंदोलने झाली आहेत. याला स्थानिक आमदारांपासून ते पीडित कुटुंबीयांचा पाठिंबा आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याशी भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपण त्याकरिता वेळ दिला नाही अशी नाराजी या महिलांनी सरकारविषयी व्यक्त केली.
आम्ही १५० किलोमीटर पायी चालत आलो आहोत. या मागची आमची व्यथा खूप मोठी आहे. आमची तळमळ आणि कळकळही तेवढीच महत्त्वाची असून, तुम्ही दारूबंदीविषयी सकारात्मक निर्णय घ्याच, अशी विनंती महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. आज आमचे आंदोलन तुम्हाला कदाचित गंभीर वाटत नसेल. परंतु आज आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास उद्या हे आंदोलन अधिक उग्र स्वरूपात पुढे येईल, असा इशारा स्वामिनी अभियानातील महिलांनी दिला आहे.
प्रमुख मागण्या
•यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी. • दारूबंदी संदर्भात कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. • शासनाने दारूविषयी जनजागृती करावी. • दारूबंदी संबंधित घटनांना हाताळण्यासाठी पोलिसांचा वेगळा कक्ष ठेवावा. • तालुका पातळीवर व्यसनमुक्ती केंद्र सुरू करा. • तालुका पातळीवर समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक करावी. • अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. • दारूबंदीच्या जिल्ह्यात सीमेवर पोलिस चौक्या स्थापित करून आत मद्याच्या बाटल्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी. • दारूबंदीसंदर्भात असलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26093

Posted by on Dec 10 2015. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (1046 of 2455 articles)


मुंबई, [९ डिसेंबर] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सातत्याने दुष्काळाची कारणे आणि त्याचे कायमस्वरुपी निवारणाबाबत ...

×