किमान तापमान : 30.44° C
कमाल तापमान : 30.81° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 6.46 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.81° C
26.59°C - 30.99°C
scattered clouds26.36°C - 29.62°C
sky is clear26.21°C - 28.95°C
scattered clouds25.5°C - 28.56°C
sky is clear25.47°C - 29.11°C
sky is clear25.63°C - 28.83°C
scattered clouds=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा=
भोपाळ, [२७ फेब्रुवारी] – विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह आज शनिवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने शुक्रवारी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता.
या घोटाळ्यात दिग्विजयसिंह आरोपी असून, शनिवारी ते विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश काशीनाथसिंह यांच्यासमोर हजर झाले. याप्रकरणी १६९ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, दिग्विजयसिंह हजर न झाल्यामुळे न्यायालयाने वॉरंट बजावला होता.
प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण यादव, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी व त्यांचे वकील विवेक तनखा हे दिग्विजयसिंह यांच्यासोबत होते. शुक्रवारी न्यायालयाने के. के. कौशल व ए. के. प्यासी यांच्यासह सात आरोपींची प्रत्येकी ३० हजारांच्या जाचमुचलक्यावर सुटका केली होती. कौशल व प्यासी हे विधिमंडळ सचिवालयातील कर्मचारी आहेत. १९९३ ते २००३ या काळात दिग्विजयसिंह मुख्यमंत्री असताना विधिमंडळ सचिवालयातील भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.