Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्लीकरांना विजेचा शॉक

दिल्लीकरांना विजेचा शॉक

=सहा टक्क्यांची दरवाढ=
Electricityनवी दिल्ली, [१५ जून] – कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आश्‍वासनही फोल ठरले आहे. दिल्ली वीज नियामक मंडळाने (डीईआरसी) आज सोमवारपासून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ केली आहे. सोबतच, बीएसईएस यमुना आणि बीएसईएस राजधानी या कंपन्यांनीही सहा टक्के आणि टाटा पॉवरने चार टक्के इतकी दरवाढ जाहीर केली.
वीज आणि पाणी स्वस्त करण्याच्या केजरीवालांच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवूनच दिल्लीकरांनी त्यांच्या आम आम आदमी पार्टीला प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते. पण, सत्तेत आल्यापासूनच रोज नवनव्या वादांमध्ये अडकत आलेले हे सरकार वीज कंपन्यांच्या या निर्णयामुळे संकटात सापडण्याची शक्यता आहे.
केजरीवाल एकीकडे दिल्लीकरांना वाढीव बिल न भरण्याचे आणि दुसरीकडे वीज दरवाढीच्या निर्णयावर कंपन्यांना फेरविचार करण्याचे आवाहन करीत आहे. कंपन्यांनी मात्र त्यांचे आवाहन धुडकावून लावले आहे. भाजपा आणि कॉंगे्रसनेही केजरीवाल सरकारवर हल्ला चढविताना, सर्वसामान्यांवर आणखी किती आर्थिक बोजा पडणार आहे, असा सवाल केला. डीईआरसीचे अध्यक्ष पी. डी. सुधाकर यांनी सांगितले की, वीज लवादाच्या आदेशानुसारच आम्ही वीज दर वाढविले आहेत. वीज उत्पादनाचा खर्च वाढला असल्याने तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करणे आवश्यक झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22928

Posted by on Jun 16 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1615 of 2452 articles)


=दूरदर्शनचा निर्णय= नवी दिल्ली, [१४ जून] - येत्या २१ जून रोजी साजर्‍या होणार्‍या पहिल्याच आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे प्रजासत्ताकदिनाच्या धर्तीवर थेट ...

×