Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दिल्लीतही दाखवला निर्भयावरील लघुपट

दिल्लीतही दाखवला निर्भयावरील लघुपट

rape_victimनवी दिल्ली, [१३ मार्च] – १६/१२ रोजीच्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांड घटनेवर बीबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीने तयार केेलेल्या लघुपटाच्या प्रदर्शनावर केंद्र सरकारने देशभरात बंदी घातली असतानाही, राजधानी दिल्लीतील एका झोपडपट्टीत गुरुवारी उशिरा रात्री हा लघुपट दाखविण्यात आला असल्याचे आज शुक्रवारी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली.
सामाजिक कार्यकर्ता केतन दीक्षितने हा लघुपट दाखविण्याचे आयोजन केले होते. आर. के. पुरम भागातील रविदास शिबिरात गुरुवारी उशिरा रात्री तो दाखविण्यात आला. सुमारे ५० पेक्षा जास्त कुटुंबातील लोकांनी तो पाहिला असल्याची माहिती आहे. हा लघुपट बघितल्यानंतर या सामूहिक बलात्कारातील आरोपींना तातडीने फासावर लटकविण्याची मागणी महिलांनी केली. या लघुपटात आरोपींच्या वकिलाने दिलेल्या प्रतिक्रियेवरही या महिलांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी ८ मार्च रोजी आग्रा येथील एका गावात हा लघुपट दाखविण्यात आला होता. बीबीसीने हा लघुपट तयार केला असून, देशात कुठेही त्याचे प्रसारण करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
एफआयआर दाखल
दरम्यान, हा लघुपट दाखविल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत, असे सूत्राने सांगितले. मात्र, या एफआयआरमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21401

Posted by on Mar 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1922 of 2453 articles)


=पंतप्रधानांचे गौरवोद्‌गार, सायबर सिटीच्या विकासासाठी मदतीची घोषणा= [gallery ids="21329,21330"] पोर्ट लुईस, [१२ मार्च] - मॉरिशस या छोट्याशा देशाने हिंदी भाषेची ...

×