Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्लीत राज्यकारभाराची गंभीर समस्या

दिल्लीत राज्यकारभाराची गंभीर समस्या

=सुप्रीम कोर्टाचेही शिक्कामोर्तब=
supreme_courtनवी दिल्ली, [२१ सप्टेंबर] – केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्लीकरांना राज्यकारभाराच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे, याची जाणीव आम्हालाही आहे, असे स्पष्ट करतानाच आतापर्यंत २२ नागरिकांचा बळी घेणार्‍या डेंग्यूवरील जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
दिल्लीतील विस्कळीत राज्यकारभारामुळे डेंग्यूच्या बळींची संख्या सातत्याने वाढत आहे, हे खरे असले, तरी यावर उपाय काढण्यासंदर्भातील जनहित याचिका आम्ही दाखल करू शकत नाही. राज्यघटनेतील विशिष्ट तरतुदीची पायमल्ली होत असल्यास त्याविरोधात जनहित याचिका दाखल करून घेता येईल. मात्र, विस्कळीत राज्यकारभारासंदर्भात कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल करून घेणे शक्य नाही, असे न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. व्ही. गोपाल गौडा यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील सरकार आपसातील मतभेद मिटवित नसतील आणि राज्यकारभाराची समस्या आणखी वाढवित असतील, तर योग्य वेळी जनताच योग्य निर्णय देईल, असे सूचक मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले.
दोन्ही सरकारांनी एकत्र बसून मतभेद दूर करणे आणि नागरिकांना सुशासन देणे, हे त्यांचेच दायित्व आहे. यात न्यायालय काहीच करू शकत नाही. राज्यकारभाराविषयीचा वाद न्यायालयात आणणे योग्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23981

Posted by on Sep 22 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1428 of 2452 articles)


=ठिकठिकाणी हिंसाचार, एक ठार= काठमांडू, [२० सप्टेंबर] - नेपाळने आज रविवारी संपूर्ण धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी राज्यघटना स्वीकारली आहे. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष ...

×