Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्लीत सम – विषम योजनेची अंमलबजावणी

दिल्लीत सम – विषम योजनेची अंमलबजावणी

delhi-traficनवी दिल्ली, [१ जानेवारी] – संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेला दिल्लीतील रस्त्यावर सम -विषम तारखेनुसार चारचाकी गाड्‌या चालविण्याचा निर्णय आजपासून अमलात आणला आहे. आज एक तारीख असल्याने विषम क्रमांक असलेल्या चारचाकी गाड्‌यांनाच दिल्ली आणि एनसीआरमध्ये वाहतूक करता येणर आहे. या योजनेला दिल्लीकरांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज शुक्रवारी दिली आहे.
देशात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला जात आहे. देशातील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सम-विषम तारखेनुसार चारचाकी गाड्‌या दिल्लीतील रस्त्यावर धावण्याचा निर्णय दिल्ली सरकारनी घेतला आहे. मात्र, या निर्णयातून सीएनजी गाड्‌यांना वगळण्यात आले आहे. सोमवार ते शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत या योजनेनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार लोकांच्या काय प्रतिक्रिया राहणार त्यावर पुढील निर्णय होणार आहे.
अनेक वाहनचालकांनी या योजनेचे स्वागत केले तर काहींनी यावर नकारात्मक भूमिका घेतली. दरम्यान या योजनेमुळे सम क्रमांक असलेल्या गाड्‌याच रस्त्यावर असल्याने काही प्रमाणात का होईना रहदारी कमी होती. त्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सुरूवातीला काही सम क्रमांकाच्या गाड्‌या रस्त्यावर दिसल्या. मात्र पोलिसांनी कार चालकांकडून दंड वसूल केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26349

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (959 of 2452 articles)


=रघुवंशप्रसादसिंह यांचा नितीशना घरचा अहेर= [caption id="attachment_26347" align="alignleft" width="300"] The Union Minister for Rural Development, Dr. Raghuvansh Prasad Singh holding ...

×