Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » दिल्लीत साकारणार आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

दिल्लीत साकारणार आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

=३१ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी=
modi3नवी दिल्ली, [४ जानेवारी] – तब्बल २५ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ जानेवारी रोजी या केंद्राची पायाभरणी करणार आहेत.
जनपथवरील ल्युटेन्स भागात आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी पूर्वीच्या संपुआ सरकारने २००४ मध्ये भूखंडही आवंटित केला होता. त्याच जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्राने दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची शिफारस उच्चस्तरीय राष्ट्रीय समितीने १९९० मध्येच केली होती. तत्कालीन पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंह समितीचे अध्यक्ष होते. या आंतरराष्ट्रीय केंद्रात राष्ट्रीय ग्रंथालय आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्या, असेही समितीने आपल्या शिफारशीत म्हटले होते.
याच समितीच्या अन्य एका शिफारशीवरून १९९२ मध्ये आंबेडकर फाऊंडेशन स्थापन करण्यात आले होते. या फाऊंडेशनला स्वायत्तता देण्यात आली आणि आता ते सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करीत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19458

Posted by on Jan 5 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2285 of 2453 articles)


सरसंघचालकांचे आवाहन रा. स्व. संघाच्या अहमदाबाद शिबिराचा समारोप अहमदाबाद, [४ जानेवारी] - भारत एक हिंदू राष्ट्र आहे. या देशात ...

×