Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दिल्ली-कानपूर शताब्दीत बॉम्बची अफवा

दिल्ली-कानपूर शताब्दीत बॉम्बची अफवा

=अनेक गाड्यांची सेवा खोळंबली=
Delhi-Lucknow_train bomb scareनवी दिल्ली, [३ जानेवारी] – पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच, दिल्ली-कानपूर शताब्दी एक्सप्रेस बॉम्बने उडविण्याची धमकी नॉर्दर्न रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर ही गाडी गाझियाबाद स्थानकावर थांबविण्यात आली. सुमारे दीड तास कसून तपासणी करण्यात आल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, यामुळे या मार्गावरील अनेक गाड्यांची सेवा खोळंबली होती.
दिल्ली रेल्वे स्थानकावरून ही शताब्दी एक्सप्रेस आज रविवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी रवाना झाल्यानंतर दिल्ली पोलिसांना या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती एका निनावी ई-मेलद्वारे प्राप्त झाली. पोलिसांनी लगेच नॉर्दर्न रेल्वेला सूचना दिली. ही गाडी गाझियाबाद स्थानकावर थांबविण्यात आली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवून गाडीची कसून तपासणी करण्यात आली. पण, कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. अखेर आठच्या सुमारास गाडी पुढील प्रवासाकरिता रवाना झाली, अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.
देशाच्या अनेक भागात पाकच्या सीमेवरून अतिरेकी घुसले आहेत. गर्दीच्या ठिकाणांसह काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्याही त्यांच्या रडारवर आहेत. यात प्रामुख्याने शताब्दी, दुरांतो, राजधानी, वैशाली एक्सप्रेस आणि निलांचल एक्सप्रेसचा समावेश आहे, अशी माहिती दिल्ली विभागीय रेल्वेचे व्यवस्थापक अरुण अरोडा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने राजधानी दिल्लीसह देशातील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांची आणि रेल्वे गाड्यांची सुरक्षा वाढविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26405

Posted by on Jan 4 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (942 of 2453 articles)


=योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन= गोरखपूर, [३ जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कटुता बाजूला सारून अलीकडेच लाहोरचा आश्‍चर्यकारक दौरा ...

×