Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दिल्ली-जयपूर महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण : गडकरी

दिल्ली-जयपूर महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण : गडकरी

nitin-gadkari11कोटपुतली (राजस्थान), [१५ ऑक्टोबर] – राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि गुलाबी शहर अशी ओळख असलेल्या जयपूरला जोडणारा परंतु रखडलेला महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण केला जाईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी सांगितले.
२०११ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प रखडण्यासाठी सरकारच जबाबदार आहे. आता फक्त तीन वगळता उड्‌डाण पुलांसह उर्वरित ५७ ठिकाणांचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर आम्ही लगेचच याचे उद्‌घाटन करू. आतापर्यंत ५० ठिकाणचे बांधकाम पूर्ण झाले आहे, असेही गडकरी म्हणाले. २००८ साली सुरू झालेला पिंक सिटी एक्सप्रेसवे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याला मंत्रालयाचे प्राधान्य आहे, असे गडकरी यांनी बसमधून या सहा पदरी मार्गाचा आढावा घेताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भूसंपादन, कंत्राटविषयक आणि इतर काही कारणांमुळे दिल्ली-जयपूर महामार्ग प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यामुळे या २६० किमी महामार्गाची १,८९६ कोटी ही मूळ किंमत वाढून आता तीन हजार कोटी झाली आहे. १४ बँकांनी या योजनेला अर्थसाह्य केले आहे आणि बँकांनी अधिक वित्तपुरवठा करावा यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा बँक अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या आहे. बँकांनी अर्थपुरवठा न केल्यास सरकार ४०० कोटी रुपये उपलब्ध करून देईल, असे गडकरी यांनी सांगितले. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली-जयपूर प्रवासासाठी सध्या लागणारा आठ तासांचा वेळ तीन तासांवर येणार असून, कमीत कमी अपघात कसे होतील, हे आम्ही सुनिश्‍चित करणार आहोत, असेही गडकरी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25147

Posted by on Oct 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1333 of 2453 articles)


=पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा= नवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] - आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ...

×