|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.62° C

कमाल तापमान : 29.87° C

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 2.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.87° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

28.75°C - 31.04°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.21°C - 30.84°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.18°C - 29.77°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.8°C - 29.52°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

26.98°C - 28.93°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.42°C - 29.8°C

overcast clouds
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दिल्ली झाली ‘रेप कॅपिटल’

दिल्ली झाली ‘रेप कॅपिटल’

=दोन महिन्यात ३०० बलात्कार, विनयभंगाची ५०० प्रकरणे=
delhi_map_outlineनवी दिल्ली, [८ मार्च] – महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आणि उपाय करण्यात आल्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत असल्याचेच दिसून येत आहे. २०१५ च्या पहिल्या दोन महिन्यातच राजधानी दिल्लीत बलात्काराच्या ३०० आणि विनयभंगाच्या ५०० च्या वर घटना उजेडात आल्या आहेत. आज महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेली आकडेवारी पाहून राजधानीतील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे दिसून येते.
शहराचे इतके भीषण वास्तव समोर आले असतानाही, दिल्ली पोलिसांनी मात्र धक्कादायक विधान केले आहे. महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत, हे खरे असले तरी मोठ्या प्रमाणात महिला आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत आहेत आणि ही सकारात्मक बाब आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने म्हटले आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजीच्या बलात्काराच्या भीषण घटनेनंतर समाज आता सकारात्मक विचार करू लागला आहे. कायदे बदलले आहेत, अत्याचार निमूटपणे सहन न करता महिला तक्रार दाखल करण्यासाठी समोर येत आहेत. याआधी महिला आपल्या परिवाराच्या प्रतिष्ठेसाठी तक्रार करीत नव्हत्या, असे हा अधिकारी म्हणाला.
या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यात बलात्काराच्या सुमारे ३०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, विनयभंग आणि छेडखानीच्या ५०० पेक्षा जास्त घटना उजेडात आल्या आहेत. गेल्या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत दिल्लीत बलात्काराच्या २०६९ आणि विनयभंगाच्या ४१७९ घटना घडल्या होत्या.

Posted by : | on : 9 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g