Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » दिल्ली, मुंबईत हाय अलर्ट

दिल्ली, मुंबईत हाय अलर्ट

delhi-police_HIGH ALARTनवी दिल्ली, [१४ नोव्हेंबर] – देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यासारखाचा सुनियोजित अतिरेकी हल्ला फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पॅरिस येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध शहरांमधील महत्त्वाच्या वास्तू आणि ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, असे सुरक्षा यंत्रणांनी प्रशासनाला सांगितले आहे. एवढेच नव्हे तर देशाच्या सीमांवरही सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे.
कायमच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असलेल्या मुंबईतही ठिकठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पॅरिस येथील अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त देवेन भारती यांनी दिली. पॅरिस येथील हल्ल्यासारखाच अत्यंत सुनियोजित हल्ला २६/११ ला मुंबईवर झाला होता आणि काही विदेशी नागरिकांसह १६६ निष्पाप नागरिकांना त्यामध्ये प्राण गमवावे लागले होते.
आर्थिक राजधानी मुंबईप्रमाणेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, संबंधित अधिकार्‍यांनी अधिक सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमुख रेल्वे स्थानकं, विमानतळं, मॉल्स, चित्रपटगृहांसह प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पॅरिस येथे अतिरेक्यांनी म्यूझिक कॉन्सर्टला जमलेले युवा, फुटबॉल चाहते आणि पॅरिस शहरातील गर्दीच्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये दीडशेपेक्षा जास्त लोक ठार झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25435

Posted by on Nov 15 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1245 of 2453 articles)


पॅरीस, [१४ नोव्हेंबर] - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काल शुक्रवारी रात्री एकाच वेळी जवळपास सात ते आठ ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. ...

×