Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दिवंगत सदस्यांप्रती विरोधकांची असंवेदनशीलता

दिवंगत सदस्यांप्रती विरोधकांची असंवेदनशीलता

=विधान परिषद तीनवेळा तहकूब=
vidhimandal gondhalमुंबई, [१३ जुलै] – ऐन शोकप्रस्तावाच्यावेळी संकटात असलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विधान परिषदेत विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा स्थगित करावे लागले. यावरून दिवंगत सदस्यांप्रती विरोधकांची असंवेदनशीलता दिसून आली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय मांडला. तसेच २८९ अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे या गंभीर विषयावर चर्चेची मागणी केली. कॉंग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनीही आधी कर्जमाफीची घोषणा करा, मगच शोकप्रस्तावार चर्चा करू असा नवाच सूर आळवला. यावेळी सरकार विरोधी घोषणा लिहिलेले फ्लेक्सचे बोर्ड फडकावत विरोधक त्यांची मागणी रेटण्याचा प्रयत्न करीत होते. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तीनदा तहकूब करण्यात आले. सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी या विषयावर सरकारची चर्चेची तयारी असल्याचे सांगत आधी शोकप्रस्तावावर चर्चा व्हावी, असे आवाहन केले. शेवटी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हस्तक्षेप करीत खडसे यांना शोकप्रस्ताव मांडण्याची अनुमती दिली.
माजी मंत्री गोविंदराव आदिक, डॉ. बळीराम वामन हिरे, प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी आमदार शांताराम पांडुरंग कळमकर, शिवाजीराव मारुतराव पाटील आदी सदस्यांना सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. सभागृह नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, प्रा.जोगेंद्र कवाडे आदी सदस्यांनी दिवंगतांच्या आठवणींना उजाळा दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23417

Posted by on Jul 14 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1554 of 2451 articles)


=संरक्षण सहकार्य, संयुक्त लष्करी कवायतींचा समावेश= बिशकेक, [१२ जुलै] - भारत आणि किर्गिस्तानमध्ये आज रविवारी चार महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात ...

×