Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळाच्या प्रभावी उपाययोजनांसाठी प्रयत्नशील : खडसे

दुष्काळाच्या प्रभावी उपाययोजनांसाठी प्रयत्नशील : खडसे

EKNATH KHADSE6मुंबई, [२३ मार्च] – राज्यात सातत्याने पडत असलेल्या दुष्काळावर कायमस्वरुपी उपाय योजण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती कृषी तथा मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेमध्ये मराठवाड्यातील दुष्काळासंबंधी चर्चेला उत्तर देताना खडसे बोलत होते.
यावेळी खडसे म्हणाले की, सततच्या दुष्काळी परिस्थितीतून शेतकर्‍याला सावरण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, शैक्षणिक शुल्क माफी, वीज बिलमाफी या बाबींमधून तात्पुरता दिलासा मिळतो. त्यामुळे कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर मागेल त्याला शेततळे ही योजना देखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकर्‍याला शेततळ्यासाठी ५० हजार अनुदान देण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांचे पाच वर्षांसाठीचे पीक विमा कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. फळबागा वाचविण्यासाठीच्या योजनेस १८१ कोटींचा प्रस्ताव तयार केला असून केंद्र शासनाला सादर करणार आहे. यामध्ये फळबागा वाचविण्यासाठी, फळबागा जळून गेल्या तर नवीन फळबागा लागवडीसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कमांड एरियामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, बोअरवेल बनवण्यास पूर्णत: परवानगी देण्यात आली आहे. तसेच कमांड एरियातील जमिनींना ज्यांना पाणी मिळालेले नाही त्याच जमिनींना अधिकचा रेडी रेकनर दर लागू राहणार नाही. त्याचबरोबर अनुदानित विद्यालयांतील विद्यार्थ्यांना मागील तीन वर्षांची आर्थिक मागासवर्ग (इबीसी) सवलत देण्यासाठी ३१ कोटी ९६ लाखांची तरतूद केल्याचेही खडसे यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27561

Posted by on Mar 24 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (577 of 2451 articles)


मुंबई, [२३ मार्च] - राजीव गांधी जीवनदायी योजनेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरिता ती नव्याने आखण्यात ...

×