Home » ठळक बातम्या, मराठवाडा » दुष्काळामुळे मराठवाड्यातील ग्रामीणांचे स्थलांतर

दुष्काळामुळे मराठवाड्यातील ग्रामीणांचे स्थलांतर

dushkalऔरंगाबाद, [१६ एप्रिल] – मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा आता अधिकच तीव्र होत असून रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी तेथील शेतकरी आणि मजूर वर्ग मुंबई-पुण्यात स्थलांतर करीत आहे. विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटना या मजुरांना मदतीचा हात देत असल्या तरी रोजगाराचा गंभीर प्रश्‍न सोडविणे फारच अवघड होऊन बसले आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे गावागावातील जनजीवनावर भीषण परिणाम होत असून दोन वेळच्या जेवणाची सोय करणे मोठेच आव्हान ठरत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणीटंचाईचा तीव्र फटका ग्रामीण भागातील कुटीर व छोट्या उद्योगांना बसला आहे. त्यामुळे यावर अवलंबून असणार्‍या कामगार व मजुरांसमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोठ्या संख्येतील तरुणांनी व मध्यमवयीन नागरिकांनी रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरल्याची माहिती आहे. ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून या स्थलांतरितांना मदत देण्यात येत असली तरी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मोठीच जबाबदारी शासनावर आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तरी हे स्थलांतरित नागरिक मुंबई-पुण्यात वास्तव्य करतील, असे सांगण्यात येते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27838

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (485 of 2454 articles)


नवी दिल्ली, [१६ एप्रिल] - संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर शनिवारपासून पाच दिवसांच्या चीन दौर्‍यावर असून, या दौर्‍यात ते चीनच्या राजकीय ...

×