Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळासाठी केंद्राकडे ४ हजार कोटी मागणार

दुष्काळासाठी केंद्राकडे ४ हजार कोटी मागणार

=एकनाथ खडसे यांची माहिती=
EKNATH KHADSE8नवी दिल्ली, [१ डिसेंबर] – महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे चार हजार कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे राज्याचे कृषी आणि महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंगळवारी येथे सांगितले.
खडसे यांनी संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषीमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, केंद्रीय चमूने महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची पाहणी करून आपला अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालावर येत्या १५ दिवसांत संबंधित खात्यांची बैठक होऊन महाराष्ट्राला तातडीने आर्थिक मदत मिळणार आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय नेत्यांनी आपल्याला दिली आहे, याकडे लक्ष वेधत खडसे म्हणाले की, ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यांना प्राधान्याने मदत करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. पिण्याचे पाणी आणि चार्‍यासाठी लागेल तितकी मदत करण्याचे आश्‍वासनही केंद्रीय नेत्यांनी आपल्याला दिले आहे.
आतापर्यंतच्या इतिहासात सर्वांत आधी महाराष्ट्राला ९२० कोटी रुपयांची दुष्काळी मदत मिळाली, असे स्पष्ट करीत खडसे म्हणाले की, महाराष्ट्राच्या आधी कर्नाटकला मदत मिळाली, या आरोपात काही तथ्य नाही. कर्नाटकला आता दोन-तीन दिवसांपूर्वी मदत मिळाली, महाराष्ट्राला तर मदतीचा पहिला हप्ता महिनाभरापूर्वीच मिळाला.
अंतिम आणेवारीचा अहवाल जोपर्यत जाहीर होत नाही, तोपर्यत केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविता येत नाही, त्यामुळे यावेळी राज्य सरकारने अंतिम आणेवारी जाहीर करण्याची मुदत १५ दिवस आधी आणत केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आधी राज्यातील १४,७०० गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, त्यात वाढ करीत आणखी ८०० गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. आता राज्यातील १५,५०० गावांत दुष्काळ जाहीर झाला असल्याचे खडसे यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून मनरेगातर्फे दुष्काळी भागात १०० दिवसांऐवजी १५० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
आधीच्या सरकारने पिकविम्याचे पैसे भरले नसल्यामुळे २०१४-१५ या आर्थिक वर्षात शेतकर्‍यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही, मात्र आमचे सरकार आल्यापासून २०१५-१६ या आर्थिक वर्षातील पिकविम्याचे पैसे शेतकर्‍यांना मिळावे म्हणून लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.
हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे खडसे यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. यावेळी खा. ए. टी. नाना पाटील आणि खा. रक्षा खडसे उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25906

Posted by on Dec 1 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1100 of 2451 articles)


नवी दिल्ली, [१ डिसेंबर] - माजी अर्थमंत्री व कॉंग्रेसचे प्रभावशाली नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या कंपन्यांवर सक्तवसुली ...

×