Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » दुसर्‍या, चौथ्या शनिवारी बँकांना मिळणार सुटी

दुसर्‍या, चौथ्या शनिवारी बँकांना मिळणार सुटी

SBI-bank holidayनवी दिल्ली, [२१ ऑगस्ट] – देशातील सर्वच बँका १ सप्टेंबरपासून महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बंद राहणार आहे. भारतीय बँक महासंघ, सरकार आणि बँकांच्या कर्मचारी संघटना यांच्यात २५ मे रोजी झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर केंद्रीय अर्थमंत्रालयाने अधिसुचना काढून काल गुरूवारी शिक्कामोर्तब केले.
वेतनवाढीसह महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सुटी मिळावी म्हणून बँक कर्मचारी प्रदीर्घ काळापासून मागणी करत होते. यासाठी त्यांनी ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ने इंडियन बँक्स असोसिएशनकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने अधिसूचना जारी केली असून बँक कर्मचार्‍यांना महिन्यातील दोन आठवडे पाच दिवसांचा आठवड्याचा लाभ मिळणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23645

Posted by on Aug 22 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1518 of 2453 articles)


=‘डिजिटल इंडिया’ इफेक्ट= नवी दिल्ली, [२१ ऑगस्ट] - नवीन गॅस कनेक्शन घेणे म्हणजे आतापर्यंत डोकेदुखीचेच काम होते. एजन्सीने मागितलेली सर्व ...

×