Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » दुसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान

दुसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान

=बिहार विधानसभा निवडणूक=
bihar-election5पाटणा, [१६ ऑक्टोबर] – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या दुसर्‍या टप्प्यात प्राथमिक आकडेवारीनुसार सरासरी ५५ टक्के मतदान झाले. या टप्प्यात ३२ जागांसाठी ४५६ उमेदवार रिंगणात होते. सकाळपासूनच मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत होत्या.
कैमूर, रोहतास, अरवल, जेहानाबाद, औरंगाबाद आणि गया या सहा जिल्ह्यांमधील ३२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. यातील बहुतांश मतदारसंघ नक्षलप्रभावित भागात असल्याने निवडणूक आयोगाने सुरक्षेचे व्यापक उपाय केले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे ५७ टक्के मतदान झाल्यानंतर शुक्रवारी पार पडलेल्या दुसर्‍या टप्प्यातही मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. नक्षलप्रभावित भाग वगळता इतरत्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.
दुसर्‍या टप्प्यात सरासरी ५५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकार्‍याने दिली. तथापि, काही मतदान केंद्रावरील अंतिम आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नसल्याने हा आकडा जास्त राहाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. २४३ सदस्यीय बिहार विधानसभेसाठी पाच टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25173

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1321 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] - राज्यातील भाजपा-सेना युती सरकारला कोणताही धोका नसून, सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितपणे पूर्ण करेल, ...

×