Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » देवेंद्र फडणवीस झाले डॉक्टर!

देवेंद्र फडणवीस झाले डॉक्टर!

=जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाने दिली मानद उपाधी=
Devendra-Fadnavis6मुंबई, [५ ऑक्टोबर] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे करण्यात आली. राज्यात आर्थिक-सामाजिक विकासाला पोषक ठरणार्‍या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
या विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट मिळविणारे फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत. १२० वर्षांची गौरवाशाली परंपरा असणार्‍या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून, गेल्या २० वर्षात आतापर्यंत ती फक्त १० लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे.
या मानद डॉक्टरेटसाठी मानकर्‍यांची निवड करताना नियमित डॉक्टरेटपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण निकष लावले जातात. वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीला पुरक ठरणारी विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कर्तबगारी दाखविणार्‍या विद्वत मान्यवरांसोबतच समाजात सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी अनुकूल असे परिवर्तन घडविणार्‍या व्यक्तींनाही या पदवीने सन्मानित केले जाते. १९९६ नंतर या विद्यापीठातर्फे डॉक्टरेटसाठी निवड करण्यात आलेल्या दहा मान्यवरांमधील केवळ दोन मान्यवरांना या निकषांवर सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची याच निकषावर डॉक्टरेटसाठी निवड करण्यात आली आहे.
फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर वर्षभराच्या आतच राज्यात विविध आघाड्यांवर सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू पहात आहे.
या मोहिमेत येत असलेल्या असंख्य अडथळ्यावर मात करून फडणवीस करीत असलेल्या प्रयत्नांचाही विद्यापीठाने प्रशंसापूर्वक उल्लेख केला आहे. या पदवीसाठी संबंधित मानकर्‍यांचा ओसाका सिटी विद्यापीठ अथवा ओसाका शहराशी वैशिष्ट्यपूर्ण संबंध अपेक्षित असतो. पश्‍चिम जपानमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा कन्साई प्रांतातील प्रमुख शहर असलेल्या ओसाकाची मुंबई शहराशी औद्योगिक क्षेत्रात भागीदारी आहे. फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात पार पडलेल्या आपल्या जपान दौर्‍यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक चर्चासत्राचे उद्‌घाटन करण्यासाठी ओसाका शहराला भेट दिली होती आणि या शहराशी विविध पातळ्यांवर असलेला महाराष्ट्राचा ऋणानुबंध अधिक दृढ केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24170

Posted by on Oct 6 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1377 of 2452 articles)


=अमित शाह यांचा चिमटा= सुपौल, [५ ऑक्टोबर] - मुंगेरीलालप्रमाणे नितीशकुमार पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहात होते व त्या महत्त्वाकांक्षेमुळेच त्यांनी रालोआशी ...

×