Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » देशद्रोह्यांसोबत राहायचे की देशभक्तांसोबत : अनुराग ठाकूर

देशद्रोह्यांसोबत राहायचे की देशभक्तांसोबत : अनुराग ठाकूर

Anurag-Thakur-BJPनवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – संसदेवर हल्ला करणार्‍यांसोबत राहायचे की संसद वाचवणार्‍यांसोबत हे कॉंग्रेसला ठरवायचे आहे, म्हणजे देशद्रोह्यांसोबत राहायचे की देशभक्तांसोबत याचा निर्णय कॉंग्रेसला घ्यायचा आहे, या शब्दांत भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी आज बुधवारी लोकसभेत कॉंग्रेसवर हल्ला चढवला. देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा काही विद्यार्थ्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दिल्या, आम्ही आमचे तुकडे होऊ देऊ, पण देशाचे तुकडे कोणत्याही स्थितीत होऊ देणार नाही, असा निर्वाळाही ठाकूर यांनी यावेळी दिला.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घटनेच्या मुद्यावर आज लोकसभेत झालेल्या चर्चेत अनुराग ठाकूर बोलत होते. कॉंग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या चर्चेला प्रारंभ केला. आपल्या भाषणात ठाकूर यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढविला. देश तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांसोबत आपला युवा नेता का उभा होता, याचे उत्तर कॉंग्रेसला द्यावे लागेल, असे ते म्हणाले. आपल्या आजोबांच्या नावावर असलेल्या विद्यापीठात जाऊन राहुल गांधी देशद्रोह्यांचे समर्थन करतात, याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.
ते देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देतात, या तुकड्यांपैकी कोणत्या तुकड्यावर राहुल गांधी यांना राज्य करायचे आहे, असा बोचरा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, या चर्चेच्या वेळी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. यावेळी सभागृहातील वातावरण प्रचंड तापले होते. दोन्ही बाजूंनी भाषणात अडथळा आणला जात होता. आरोप-प्रत्यारोप केले जात होते. त्यामुळे सभागृहात शांतता राखण्याचे आणि भाषणात अडथळा न आणण्याचे आवाहन सभापती सुमित्रा महाजन यांना वारंवार करावे लागत होते. विशेष म्हणजे, सोनिया गांधीही हातवारे करीत अनुराग ठाकूर यांच्या भाषणावर हरकत घेताना दिसत होत्या. एका क्षणी नियम पुस्तकातील नियम वाचून दाखवत ज्योतिरादित्य शिंदे यांनी अनुराग ठाकूर यांच्या भाषणावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर वारंवार सांगूनही दोन्ही बाजूंनी नाव घेतली जात आहेत, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, असे सांगत सुमित्रा महाजन यांनी हरकतींचा मुद्दा फेटाळून लावला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करणार्‍या कॉंग्रेसला १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणिबाणी लावली होती, याचा विसर का पडतो, अशी विचारणा करीत ठाकूर म्हणाले की, काश्मीर समस्या ही जवाहरलाल नेहरूंची देशाला दिलेली उपलब्धी आहे, ज्याची किंमत आम्ही गेली ६६ वर्षे चुकवत आहोत.
बटाला हाऊस एनकाऊंटर झाले, त्यावेळी सोनिया गांधी खुप रडल्या होत्या, असे कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले होते, मात्र त्या एनकाऊंटरमध्ये शहीद झालेल्या पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्या घरी जायला त्यांना वेळ मिळाला नाही, असा टोला ठाकूर यांनी लगावला. राहुल गांधी जेएनयूत गेले, पण शहीद जवानांच्या घरी जायला त्यांना वेळ मिळाला नाही, असा आरोप करीत ठाकूर म्हणाले की, अफजल गुरू दहशतवादी होता की नाही, हे सोनिया गांधी यांनी आता सांगितले पाहिजे.
तिरंगा फडकवला म्हणून कॉंग्रेस सरकारने मला, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना अटक करून तुरुंगात टाकले होते, याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.
कॉंग्रेससाठी फॅमिली फर्स्ट, पार्टी नेक्स्ट आणि नेशन लास्ट आहे, असा आरोप करीत ठाकूर म्हणाले की, आमची स्थिती याच्या उलट आहे. आमच्यासाठी नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट आणि आम्ही लास्ट आहोत. देशाच्या विरोधात नारे देणार्‍यांविरुद्ध बोलणे चूक असेल, तर ती चूक आम्ही करणार, असे ठाकूर म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदे
जेएनयूमधील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप चर्चेला सुरुवात करताना कॉंग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दादरी, रोहित वेमुला आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकारचा या विद्यापीठावर आणि विद्यार्थ्यांवर आकस आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.
काही विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्यामुळे संपूर्ण विद्यापीठाला बदनाम करता येणार नाही. फक्त नारे दिल्यामुळे कोणाला राष्ट्रद्रोही ठरवता येणार नाही, असे न्यायालयाच्या काही निर्णयांचा दाखला देत शिंदे यांनी सांगितले. ज्या घोषणा दिल्या त्याचे कोणीही समर्थन करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या मुद्यावरून शिंदे यांनी सरकारवर हल्ला चढवला. आपले विचार स्पष्टपणे मांडून वेमुलाने चूक केली, असे शिंदे उपरोधिकपणे म्हणाले. आंबेडकरांच्या मार्गावर चालणे हा राष्ट्रद्रोह आहे, का अशी विचारणा करीत शिंदे यांनी एका विद्यार्थ्यांवर पूर्ण सरकार तुटून पडले, असा आरोप केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26864

Posted by on Feb 25 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (821 of 2453 articles)


=हार्दिक पटेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा संताप, नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करणार= नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - पाटिदार समुदाच्या आरक्षण आंदोलनाच्या काळात प्रचंड ...

×