Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशभरात मिळणार ५ किलोचे अनुदानित सिलेंडर

देशभरात मिळणार ५ किलोचे अनुदानित सिलेंडर

lpg_GAS 5KGभुवनेश्‍वर, [५ जानेवारी] – देशभरातील एलपीजी वितरण केंद्रांवर आता पाच किलो वजनाचे अनुदानित गॅस सिलेंडर प्राप्त होणार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या सालिया साही येथे आज सोमवारी या योजनेचा शुभारंभ केला.
ग्राहकांना स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर तत्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या १४.२ किलो वजनाचे गॅस सिलेंडर घरगुती वापरासाठी वितरकांकडून उपलब्ध केले जाते. त्यात आता पाच किलोच्या अनुदानित सिलेंडरचीही भर पडली आहे.
गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठीच सरकारने या योजनेच्या शुभारंभाकरिता झोपडपट्टीची निवड केली आहे. यात कुठलेही राजकारण नाही. ओडिशातील सत्तारुढ बिजदने मात्र भाजपावर टीका केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भाजपाने या झोपडपट्टीची निवड केली आहे. पण, आमच्या मतदारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे या पक्षाने म्हटले आहे.
दरम्यान, बीपीएल कार्डधारकांना नव्या एलपीजी कनेक्शनवर १६०० रुपयांची सबसिडी मिळावी, यासाठी सरकार आणखी एक योजना राबविणार आहे. या योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शनसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव तेल कंपन्या आपल्या प्रमंडळ सामाजिक जबादारी निधीतून भरतील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्राने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19477

Posted by on Jan 6 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2281 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ जानेवारी] - भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांसोबत युद्धाचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे, ...

×