Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का?

देशविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का?

=भाजपाध्यक्ष अमित शाहंचा राहुल गांधींना सवाल=
amit-shah-7बहराईच, [२४ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही प्रकाराचे समर्थन करून, त्याचे राजकीय भांडवल करणारे कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज बुधवारी येथे खरपूस समाचार घेतला. देशविरोधी घोषणा देण्याचा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मान्य करता येऊ शकतो काय, असा सवाल अमित शाह यांनी राहुल यांना केला.
केवळ व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठी राहुल गांधी देशाचे विभाजन करणार्‍या शक्तींचे समर्थन करीत आहेत, अशी सणसणीत चपराक अमित शाह यांनी हाणली. राष्ट्रविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे काय, यावर आज संसदेत चर्चा सुरू झाली आहे. याच अनुषंगाने मी कॉंगे्रसचे नेते व कार्यकर्त्यांना एकच प्रश्‍न विचारत आहेे, तो असा की, ‘अफजल गुरू तेरे हत्यारे जिंदा है,’ आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा प्रकारच्या घोषणा देणे देशद्रोह आहे की नाही? असे अमित शाह म्हणाले. अकराव्या शतकातील श्रावस्ती नरेश सुहेलदेव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
देशाच्या लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेत बसलेल्या सर्वच राजकीय पक्षांनीदेखील माझ्या या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे, तसेच अशा घोषणा देणे देशद्रोह नाही काय, याचा निर्णय देशवासीयांनीही घ्यावा, असे माझे आवाहन असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषत: राहुल गांधी यांनी राष्ट्रविरोधी घोषणांचे आपण समर्थन करतो, असे देशवासीयांपुढे जाहीर करावे आणि तसे नसेल, तर त्यांनी अशा घोषणा देणार्‍यांचा निषेध करावा, असे सांगताना, केवळ मतांच्या राजकारणासाठी राहुल गांधी यांनी इतकी खालची पातळी गाठायला नको, असे आवाहन त्यांनी केले. हजारो, लाखो नागरिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि आता तुम्ही देशाचे विभाजन करू पाहणार्‍या शक्तींना पाठिंबा देत आहात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26870

Posted by on Feb 25 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (819 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रद्रोहाच्या घटनेच्या विरोधात आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रामलीला मैदानापासून जंतरमंतरपर्यत ...

×