Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » देशाची विदेशी गंगाजळीचा विक्रमी उच्चांक

देशाची विदेशी गंगाजळीचा विक्रमी उच्चांक

=३२७.८८ अब्ज डॉलर्सच्या घरात=
foreign investmentमुंबई, [७ फेब्रुवारी] – केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने विदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले, त्यामुळे देशाच्या विदेशी गंगाजळीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. विदेशी गंगाजळीत ५.८४ अब्ज डॉलर्स इतकी वाढ होऊन विदेशी चलनाचा साठा आता ३२७.८८ अब्ज डॉलर्सच्या घरात गेला आहे.
देशातील विदेशी चलनाचा साठा १६ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात ३२२.१३५ अब्ज डॉलर्स इतका होता. विदेशी चलन मालमत्तेत वाढ झाल्याने गंगाजळीत इतकी विक्रमी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या चार वर्षातील उच्चांक ठरली होती. त्यानंतर ३० जानेवारीला संपलेल्या आठवड्यात गंगाजळीतील विदेशी चलनसाठ्याने आतापर्यंतची नवी विक्रमी पातळी गाठली आहे. याबाबतची माहिती देणारा अहवाल शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात भारताचा विदेशी चलनसाठा आजवरच्या सर्वात उच्चांकी पातळीवर पोहोचला असून, त्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ६.८ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
भारताच्या विदेशी गंगाजळीत इतकी विक्रमी वाढ होण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट कारणीभूत ठरली आहे. आयातीवरील खर्च कमी झाल्याने विदेशी चलनसाठा वाढला आहे. सप्टेंबर २०११ मध्ये भारताचा विदेशी चलनसाठा ३२०.७९ अब्ज डॉलर्स इतका होता. तथापि, देशातील सोन्याचा साठा १९.३७७ अब्ज डॉलर्स इतका कायम आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20373

Posted by on Feb 8 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2102 of 2453 articles)


=अनिवासी भारतीय संशोधकाचा दावा= वॉशिंग्टन, [७ फेब्रुवारी] - लाल द्राक्षे आणि शेंगदाणे यासारख्या सर्वसामान्य खाद्यपदार्थांमध्ये आढळून येणार्‍या घटकांमुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश ...

×