Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशात ‘ईद’ उत्साहात साजरी

देशात ‘ईद’ उत्साहात साजरी

=पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा=
ramjan-eid-in-delhiमुंबई, [१८ जुलै] – आज सर्वत्र रमजान ईद मोठ्‌या उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही टि्‌वटरवरून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत उपवास करून रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.
दिल्ली, आसाम, लखनऊ परिसरात काल शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी आज देशभरात ईद साजरी केली जाईल, अशी घोषणा केली आणि देशभरातील मुस्लिम बांधवांनी एकच जल्लोष केला. मुंबईत मोहम्मद अली रोड, मिनारा मशिद, माहिम यांसारखे मुस्लिमबहूल भाग गर्दीने फुलून गेले. ‘ईद उल फित्र’ निमित्ताने देशभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिनाभर रोजा पाळल्यानंतर विविध प्रकारचे खाद्पदार्थ आणि मिष्टान्नांवर ताव मारत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23459

Posted by on Jul 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1549 of 2453 articles)


=क्रिसिलचा दावा= नवी दिल्ली, [१८ जुलै] - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ज्या चांगल्या दिवसांची ग्वाही दिली होती, ...

×