Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » देशात धर्मांतरविरोधी कायदा आवश्यक

देशात धर्मांतरविरोधी कायदा आवश्यक

=कलराज मिश्र यांचे मत, राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन=
Kalraj_Mishra1लखनौ, [२५ मार्च] – सक्तीच्या धर्मांतरणावर आळा घालण्यासाठी देशात धर्मांतरविरोधी कायदा आवश्यक आहे, असे मत व्यक्त करतानाच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कलराज मिश्र यांनी हा कायदा तयार करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
देशात सक्तीच्या धर्मांतरणावर बंदी घालण्यासाठी ठोस कायदा असायलाच हवा, अशी भूमिका भाजपाने आधीपासूनच घेतली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने यासाठी सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मी स्वत:देखील अशा कायद्यासाठी वारंवार पुढाकार घेतला आहे, असे सांगताना विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानाशी भाजपाचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू-काश्मिरातील कट्टरपंथी नेता मसरत आलमला मुक्त करण्यावरून भाजपा-पीडीपीत निर्माण झालेल्या तणावावर बोलताना मिश्र म्हणाले की, देशविरोधी कारवाया भाजपा कदापि मान्य करणार नाही. भाजपाने राज्य सरकारला या संदर्भात वेळोवेळी इशारा जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्यावर कठोर भूमिका घेतल्यानंतर सरकारनेही यापुढे कोणत्याही कट्टरपंथी नेत्याची सुटका न करण्याची हमी दिली आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21726

Posted by on Mar 26 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1848 of 2453 articles)


केबीसीच्या भाऊराव चव्हाणला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू संपत्तीचा लिलाव करून गुंतवणूकदारांना रक्कम देणार= मुंबई, [२४ मार्च] - पोलिसांबरोबर संगनमत ...

×