Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशात नरेंद्र मोदी लाट कायम

देशात नरेंद्र मोदी लाट कायम

=सर्वेक्षणातील सत्य=
narendramodi-pmनवी दिल्ली, [७ एप्रिल] – देशातील मोदी लाट अजूनही ओसरली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशातील लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. इकोनॉमिक टाईम्स आणि टीएनएस यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात लोकांना काही प्रश्‍न विचारण्यात आले, त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मोदी सरकारला तरुण वर्गाची सर्वाधिक पसंती आहे. त्यांना अजूनही अच्छे दिन येणार असल्याची व आपल्या उज्ज्वल भविष्याची खात्री वाटत आहे. या सर्वेक्षणानुसार मोदी सरकारच्या आर्थिक विकासाच्या मुद्याला लोकांनी ८६ टक्के गुण दिले आहेत. ६२ टक्के लोकांच्या मते मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत, तर ५८ टक्के लोकांना अजूनही आशा आहे की येणार्‍या काळात आर्थिक सुधारणा आणि नोकरी उपलब्धतेच्या मुद्यात आणखी सुधारणा होईल.
सर्वेक्षणातील सहभागी लोकांनी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला ७६ टक्के, मेक इन इंडिया अभियानाला ६५ टक्के, तर डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी योजनेला प्रत्येकी ५५ टक्के गुण दिले असल्याचे दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सर्वेक्षणात ७.६८ गुण, अर्थमंत्री अरुण जेटली यांना ५.८६ गुण, तर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना १० पैकी केवळ ३.६१ गुण मिळाल्याचेही नोंदले गेले आहे. तसे असले तरी मोदी सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधाने आणि सरकारच्या काही क्षेत्रातील अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर, अजूनही नरेंद्र मोदी हेच लोकांमध्ये लोकप्रिय असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
याशिवाय देशात, देशभक्ती नावे ठेवणे आणि देशद्रोहाचे सर्वाधिक आरोप कोणाकडून लावले जातात, या प्रश्‍नावर ४६ टक्के लोकांनी कॉंग्रेसचेच नाव घेतले असून ११ टक्के लोकांनी भाजपा, तर २५ टक्के लोकांनी यासाठी विविध विद्यापीठातील विद्यार्थिनेत्यांना जबाबदार धरले आहे.
या सर्वेक्षणातून लोकांनी गुणांची जी वेगवेगळी टक्केवारी सादर केली त्यातून नरेंद्र मोदी अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी अजूनही खूप मागे असल्याचे दिसते.
या सर्वेक्षणानुसार मोदी सरकारच्या आर्थिक विकासाच्या मुद्याला लोकांनी ८६ टक्के गुण दिले आहेत. ६२ टक्के लोकांच्या मते मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत, तर ५८ टक्के लोकांना अजूनही आशा आहे की येणार्‍या काळात आर्थिक सुधारणा आणि नोकरी उपलब्धतेच्या मुद्यावर आणखी सुधारणा होईल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27748

Posted by on Apr 8 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (513 of 2453 articles)


=तूर्तास निष्कर्ष काढू नका : आरबीआयचा इशारा= नवी दिल्ली, [६ एप्रिल] - भारतासह जगभरातील बड्या व्यक्तींचा काळा पैसा उघड करणार्‍या ...

×