Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशात यापुढे ३-डी गतिरोधक

देशात यापुढे ३-डी गतिरोधक

=नितीन गडकरी यांची संकल्पना, सोशल मीडियावर रंगली चर्चा=
3d speed_breaker nitin gadkari conceptनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – बाजार, शाळा, रुग्णालयाजवळील मुख्य मार्गावर वाहनांची गती कमी करण्यासाठी बांधण्यात येणारे गतिरोधक आता हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, देशात आता रस्त्यांवर त्रिमितीय (३-डी) गतिरोधक आणण्याची संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुचवली आहे.
गतिरोधक बांधण्याऐवजी त्याजागी ३-डी पद्धतीने गतिरोधकाचे चित्र रेखाटण्याची कल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा मानस आहे, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातून गतिरोधक हद्दपार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नितीन गडकरींच्या या नव्या संकल्पनेचे अनेकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी त्यास विरोध केला आहे. ३-डी गतिरोधकाची संकल्पना अमेरिका आणि कॅनडामध्ये १४ वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. आपल्याला आता जाग आली, असे म्हणत एका ट्विटरकराने नाराजी व्यक्त केली, तर पुढे ३-डी गतिरोधक असल्याची कल्पना एकदा का वाहनचालकाला आली की पुढील वेळेस तो तेथून जाताना वाहनाची गती कमी करेल का? असा सवाल एका ट्विटरकराने उपस्थित केला आहे. एका नेटिझन्सने गडकरी यांच्या संकल्पनेचे स्वागत करत हे ३-डी गतिरोधक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रंग परावर्तित पद्धतीचे असावेत, असा सल्ला दिला आहे.
रस्ते अपघातातील बळींची संख्या लक्षात घेता गडकरी यांनी या नवीन संकल्पनेचा पुरस्कार केला आहे. दरवर्षी देशात पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यात १.५ लाख नागरिकांचा मृत्यू होतो, तर तीन लाख लोकांना अपंगत्व येते. ही भीषण वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर गडकरींच्या कल्पनेचे स्वागत होत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28005

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (434 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - आगामी तीन दिवस संसदेत नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी भाजपाने आपल्या खासदारांवर पक्षादेश (व्हीप) बजावला आहे. भाजपा ...

×